कार्यकारिणीच्या निवडीवरुन नाराज, भाजप कार्यकर्त्याची नड्डा-चंद्रकांत पाटलांना नोटीस

| Updated on: Jul 29, 2020 | 4:51 PM

पाथर्डी तालुका कार्यकारिणीच्या निवडीवरुन थेट अध्यक्षांना नोटीस पाठवल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

कार्यकारिणीच्या निवडीवरुन नाराज, भाजप कार्यकर्त्याची नड्डा-चंद्रकांत पाटलांना नोटीस
Follow us on

अहमदनगर : पाथर्डी तालुका कार्यकारिणीच्या निवडीवरुन नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्याने थेट पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. अहमदनगरमधील कार्यकर्त्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना नोटीस पाठवली. (Ahmednagar BJP volunteer sends legal notice to BJP President)

अहमदनगरमधील भाजप कार्यकर्ते सुनील पाखरे आणि नवनाथ गर्जे यांच्या वतीने अ‍ॅड. दिनकर पालवे यांनी नोटीस पाठवली आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना नोटीस धाडण्यात आली आहे.

हेही वाचा : “शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं” रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

पाथर्डी कार्यकारिणीची निवड करताना विश्वासात न घेतल्याचा आरोप पाखरे आणि गर्जे यांनी केला आहे. आपल्या नोटिशीची दखल न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

पाथर्डी तालुका कार्यकारिणीच्या निवडीवरुन थेट अध्यक्षांना नोटीस पाठवल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशा प्रकारची नोटीस पाठवण्याची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जाते.

महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारिणीच्या स्थापनेनंतर पहिली बैठक दोनच दिवसांपूर्वी पार पडली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नेत्यांना आक्रमक होण्याचा सल्ला दिला. तसेच भाजप पुढील प्रत्येक निवडणुका स्वबळावर लढवेल, असा नाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारिणीत कोण कोण?

प्रमुख कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत 12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष आहेत. कार्यकारिणीचे सदस्य 69 असतील, तर निमंत्रित सदस्य 139 जण असतील. सर्व आमदार-खासदार कायम सदस्य असतात.

(Ahmednagar BJP volunteer sends legal notice to BJP President)