AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! राष्ट्रवादी एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार, अजित पवार स्वत: दिल्लीला जाणार

15 जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस नाही. पेरण्या अतिशय नगण्य झाल्या आहेत. शेतकरी त्रासून गेलेला आहे. धरणांमधील पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्लोबल वॉर्मिगमुळे चक्र बदलले आहे, असं अजित पवार म्हणाले.

मोठी बातमी ! राष्ट्रवादी एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार, अजित पवार स्वत: दिल्लीला जाणार
ajit pawar Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 15, 2023 | 12:39 PM
Share

चैतन्य मनिषा अशोक, नाशिक, दिनांक 15 जुलै 2023 : कायम काँग्रेस आणि संयुक्त पुरोगामी आघाडीसोबत राहिलेल्या राष्ट्रवादीने आता वेगळा मार्ग पत्करला आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत गेला आहे. या गटाने भाजपशी हातमिळवणी करून राज्यातील सत्तेतही सहभाग घेतला आहे. आता हाच गट भाजपच्या नेतृत्वातील एनडीएतही सामील होणार आहे. एनडीएची पुढच्या आठवड्यात दिल्लीत बैठक होणार असून राष्ट्रवादीचा हा गट एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

येत्या 18 जुलै रोजी एनडीएची बैठक होत आहे. या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला जाणार आहेत. त्यांच्यासोबत भाजप नेते प्रफुल्ल पटेलही असणार आहेत. स्वत: अजित पवार यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून राज्यातील समस्या त्यांना सांगणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत. पहिल्यांदाच अजित पवार नाशिकला आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली.

मोदींचं नेतृत्व करिश्मा असलेलं

केंद्रात नरेंद्र मोदी यांचा करिश्मा असलेलं नेतृत्व आहे. मी सकाळी येत असताना, अनेक लोकं मला भेटली. वंदे भारत ही ट्रेन चांगली असल्याचे प्रवाशांनी सांगितलं, असं अजित पवार म्हणाले. उद्या जर विरोधकांनी चहा पानावर बहिष्कार नाही टाकला, तर आम्ही सहकार्य करू. जो काम करतो, त्याच्याच तक्रारी असतात. काही तक्रारी असतील, तर आम्ही सोडवू. एखादं काम चांगलं असेल, तर मी त्याच्यावर टीका करत नाही. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावर मी कधीच टीका केली नाही. नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे, असंही ते म्हणाले.

तो अधिकार विधानसभा अध्यक्षांचा

विरोधी पक्षाच्या नेत्याची निवडीबाबतही त्यांनी भाष्य केलं. विरोधी पक्षनेत्याच्या निवडीबाबत विधानससभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर बघतील ना. विरोधकांकडून पत्र तरी आलं पाहिजे. ती निवड अधिवेशनाच्या काळात करतात. 17 तारखेला अधिवेशन सुरू होणार आहे. तीन आठवडे सुरू राहणार आहे. विरोधी पक्षनेता निवडण्याचा संपूर्ण अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

प्रत्युत्तर देणार

शरद पवार यांची सभा झाली आहे. त्यानंतर खाते वाटप होतं. आता अधिवेशन आहे. ते झाल्यावर आम्ही सभा घेऊ. तुम्ही काळजी करू नका. आम्ही योग्य निर्णय घेऊ. उद्या चहापानाचा कार्यक्रम आहे. उद्या मंत्र्यांची 10 वाजता मिटिंग आहे. आदिती तटकरे, संजय बनसोडे हे नवीन आहेत. आम्ही बाकीचे सहाजण अनुभवी आहोत. प्रश्नाची उत्तरे देणं अवघड आहे असं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

तर विचार करू

यावेळी त्यांनी समान नागरी कायद्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. समान नागरी कायद्याचा ड्राफ्ट पाहिल्यावर आम्ही आमची भूमिका मांडू. कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही, अशी आमची भूमिका आहे. 370 कलम काढलं, चांगली गोष्ट झाली. समान नागरी कायद्याचा ड्राफ्ट जर संपूर्ण देशाच्या भल्याचा असेल, तर विचार करू, असं त्यांनी सांगितलं.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.