सांगू का आता पोलिसांना उचलायला, पुन्हा म्हणाल दादा लय कडक आहे, कॅमेरामनवर अजित पवारांची टोलेबाजी

| Updated on: Aug 28, 2021 | 12:03 PM

फळे व भाजीपाला हाताळणी केंद्राचा बारामतीसह आसपासच्या तालुक्यांना फायदा होईल. 1000 कोटी रुपयांचा प्रकल्प राज्यात राबवत आहोत. प्रत्येक जिल्ह्यात हे सुविधा केंद्र सुरु करणार. फळांवर प्रक्रिया करण्याचं काम या प्रकल्पात होणार आहे.

सांगू का आता पोलिसांना उचलायला, पुन्हा म्हणाल दादा लय कडक आहे, कॅमेरामनवर अजित पवारांची टोलेबाजी
Follow us on

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्या हस्ते बारामती बाजार समितीच्या (Baramati Bazar Samiti) फळे व भाजीपाला हाताळणी केंद्राचं भूमीपूजन झालं. यावेळी बोलताना अजित पवारांनी कोरोनाच्या त्रिसूत्रीवर भर दिला. मात्र त्यावेळी एक कॅमेरामन विनामास्क दिसल्यानंतर, अजित पवारांनी त्यांच्या शब्दात टोलेबाजी केली. “हा बघा पठ्ठ्या, तू शूटिंग करतोय आणि मास्क काढून ठेवलाय. सांगू का पोलिसांना कारवाई करायला. तुझ्यामुळे बाजूच्याला कोरोना व्हायचा” असं अजित पवार म्हणाले.

फळे व भाजीपाला हाताळणी केंद्राचा बारामतीसह आसपासच्या तालुक्यांना फायदा होईल. 1000 कोटी रुपयांचा प्रकल्प राज्यात राबवत आहोत. प्रत्येक जिल्ह्यात हे सुविधा केंद्र सुरु करणार. फळांवर प्रक्रिया करण्याचं काम या प्रकल्पात होणार आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला शेतमाल जगाच्या बाजारपेठेत पाठवण्यासाठी हा प्रकल्प आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

बाराही महिने सर्व फळं, पवारासाहेबांमुळे क्रांती

शरद पवार यांनी राष्ट्रीय फलोत्पादन योजना राबवली. त्यातून मोठी क्रांती झाली. बाराही महिने सर्व फळं मिळतात. ही क्रांती पवारसाहेबांच्यामुळे झाली. या केंद्रातून आलेली फळे, भाजीपाला व्यवस्थित आणि आकर्षक पॅकिंग करुन ती पोहोचवली जाईल. राज्यात फलोत्पादन वाढीसाठी शरद पवार यांच्याकडून सूचना. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून संशोधन होणार, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

कोरोनाच्या संकटामुळे सरकारच्या उत्पन्नावर परिणाम झाला. गेल्यावर्षी दीड लाख कोटी उत्पन्न घटलं. कोरोनाच्या दोन लाटा आल्या. तिसऱ्या लाटीची शक्यता आहे. प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे. मास्क वापरला पाहिजे. हा पठ्ठ्या बघा समोर. तू शूटिंग करतोय आणि मास्क काढून ठेवलाय. सांगू का पोलिसांना कारवाई करायला.. तुझ्यामुळे बाजूच्याला कोरोना व्हायचा, अशी फटकेबाजी अजित पवारांनी केली.

खासगी पेट्रोलपंपवाले बोंब मारणार

आता डिझेलवरच्या एसटी बस घ्यायच्याच नाहीत. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट आहे. सरकारने मदत केली. खासगी पेट्रोलपंपवाले बोंब मारणार. सहकारी संस्थांद्वारे पेट्रोलपंप सुरु केले. बारामतीत गॅस वाहिनीचे काम सुरु आहे. लोकांना थेट घरात गॅस मिळणार. आज कार्यक्रम आहे म्हणून चकाचक दिसतंय. पण कधीही आलं तरी परिसर स्वच्छच दिसला पाहिजे, असंही अजित पवारांनी यावेळी दरडावलं.

पूर्वी आघाडी सरकार असता पणन आणि सहकार खातं कॉंग्रेसकडे असायचं. मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर हे खाते राष्ट्रवादीकडे घेतले. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील उत्तम साखर कारखाना चालवतात. आता त्यांच्याकडे 20 लाख पोती साखर आहे. आता साखरेचे दर वाढलेत. त्यासाठी हिम्मत असावी लागते ती बाळासाहेब पाटलांमध्ये आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

बाळासाहेबांचं तिकीट कापल्याचा किस्सा

सातारा पालकमंत्री असताना बाळासाहेबांचं तिकिट कापलं गेलं. तेव्हा आम्ही जरा विचारात पडलो. बाळासाहेबांनी अपक्ष निवडणूक लढवली. आम्हीही त्यांना मदत केली आणि ते 43 हजार मतांनी निवडून आले. नंतरही त्यांनी आमची साथ सोडली नाही, असा किस्सा अजित पवारांनी सांगितलं.

VIDEO : अजित पवारांचं संपूर्ण भाषण