अजित पवार का म्हणाले, ड्रायव्हरला आपली बारीकसारीक माहिती असते

सुनिल तटकरे यांचे वडील राजकारणात होते. त्यावेळी वडील जेव्हा दौऱ्यावर जात त्या-त्या वेळी सुनिल तटकरे त्यांच्या गाडीवर चालकाची भूमिका निभावत होते. वडील कोणाशी कसे बोलतात, कसे चालतात, त्याच्या बॉडी लॅग्वेज या सर्व गोष्टींचा अभ्यास त्यांनी केला.

अजित पवार का म्हणाले, ड्रायव्हरला आपली बारीकसारीक माहिती असते
अजित पवार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 09, 2023 | 4:06 PM

मुंबई : खासदार सुनिल तटकरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा सोमवारी झाला. या समारंभास दिग्गज लोकांची उपस्थिती होती. यामुळे समारंभात राजकीय चर्चाही रंगली. अजित पवारांपासून भास्कर जाधव यांच्यापर्यंत अनेकांनी किस्से सांगत सत्ताधारींवर टीका करण्याची संधी सोडली नाही.

राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे (Sunil Tatkare) पुस्तक प्रकाशन सोहळ्या दरम्यान राजकीय शाब्दीक फटकारले रंगले. यावेळी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचं भाषण चांगलेच रंगले. पुस्तकातील भाव वाचून त्यांनी सुनिल तटकरे यांना काही सल्ले दिले.सभागृहाचे दुरुपयोग कसा होत आहे, हे भास्कर जाधव यांनी सांगताना जयंतराव पाटील यांच्या निलंबनाबाबत मुद्दा पुन्हा काढला. जयंत पाटील सारख्या व्यक्तीचा संयम सुटतो, हे विधिमंडळाचे काम कसे चालते हे दाखवून दिले.

अजित पवार यांनी आपल्या भाषणात सुनिल तटकरे राजकारणात कसे आले? याचा किस्सा सांगितला. सुनिल तटकरे यांचे वडील राजकारणात होते. त्यावेळी वडील जेव्हा दौऱ्यावर जात त्या-त्या वेळी सुनिल तटकरे त्यांच्या गाडीवर चालकाची भूमिका निभावत होते. वडील कोणाशी कसे बोलतात, कसे चालतात, त्याच्या बॉडी लॅग्वेज या सर्व गोष्टींचा अभ्यास त्यांनी केला. कारण आपला सर्व बारीकसारीक गोष्टींची माहिती असते ते आपल्या चालकाला. त्यामुळे सुनिल तटकरे यांनी चालकांची भूमिका निभावत राजकारण शिकले.

Follow Us