AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | “दादा मास्क काढा” भाषणादरम्यान चिठ्ठी, अजित पवार म्हणतात, “हा शहाणा मला सांगतोय”

अजित पवार भाषण करत असताना त्यांना एक चिठ्ठी आली. त्यावर "दादा मास्क काढा" असं लिहिलेलं होतं. (Ajit Pawar Pandharpur Mask)

VIDEO | दादा मास्क काढा भाषणादरम्यान चिठ्ठी, अजित पवार म्हणतात, हा शहाणा मला सांगतोय
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 08, 2021 | 12:59 PM
Share

पंढरपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीतील (Pandharpur By Poll) राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा प्रचार (Bhagirath Bhalke) केला. यावेळी भाषण करताना अजित पवारांना “मास्क काढा” (Mask) असं लिहिलेली चिठ्ठी आली. त्यावर अजितदादांनी “मी जनतेला सांगतो मास्क वापरा आणि हा शहाणा सांगतो मास्क काढा” असं मिश्कील भाष्य केलं. (Ajit Pawar taunts man in Pandharpur who asked to remove Mask)

पंढरपुरात भाषणादरम्यान चिठ्ठी

पंढरपुरात अजित पवारांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale Joins NCP) यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी अजित पवार बोलायला उभे राहिले. अजित पवार भाषण करत असताना त्यांना एक चिठ्ठी आली. त्यावर “मास्कमुळे आवाज येत नाही, दादा मास्क काढा” असं लिहिलेलं होतं. कार्यकर्त्याने पाठवलेली ही चिठ्ठी अजित पवारांनी भरसभेत जाहीर वाचून दाखवली. “मी जनतेला सांगतो मास्क वापरा आणि हा शहाणा सांगतो मास्क काढा म्हणून” असं अजितदादा म्हणताच एकच हशा पिकला.

पाहा व्हिडीओ :

“भारतनानांचे अधुरे स्वप्न भगीरथ पूर्ण करेल”

“पाच वर्षांसाठी इथल्या जनतेने भारत नानांना (दिवंगत आमदार भारत भालके) निवडून दिले होते, त्यांचं काम पण सुरु होतं, मात्र काळाने घाला घातला. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांनी भगीरथ भालकेला विधानसभेत पाठवायचे आहे. भगीरथ भालके यांनी भारत नानांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करावे, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सर्व ताकद लावीन” अशी हमी अजित पवारांनी दिली.

अजित पवारांचे पांडुरंगाला साकडे

“हे पांडुरंगा राज्यावर आलेलं कोरोनाचं संकट दूर कर” असं म्हणत अजित पवारांनी पांडुरंगाला साकडे घातले. “कोरोना राज्यात वाढलाय. त्यासाठी नियम पाळावे लागतायत. कोरोना नियंत्रणसाठी केंद्राने लस द्यायला पाहिजे. जनतेने आमच्यावर प्रेम केले म्हणून तीस वर्षे राजकारणात आहोत. भाजप हा ग्रामीण भागात फारसा लोकप्रिय नाही. अजून काही प्रश्न सोडवायचे आहेत, हे प्रश्न सोडवण्याची धमक फक्त महाविकास आघाडीत आहे. काळानुतरुप नवीन लोकांना संधी द्यावी लागते” असंही अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar taunts man in Pandharpur who asked to remove Mask)

“स्वतःचं पोट उपाशी ठेवून शेजाऱ्याला लस”

“लोकांना लॉकडाऊन नको आहे. शेवटी माणसंही जगली पाहिजेत. 18 वर्षांच्या पुढील लोकांना लस द्या. परदेशात लस पाठवण्याच्या आधी आपल्या देशात लस द्या. स्वतःचं पोट उपाशी ठेवून शेजाऱ्याला लस दिले जाते. आपल्याकडे यंत्रणा आहे. सीरमवर केंद्राचं कंट्रोल आहे, नाहीतर आम्ही सीरमला लस द्यायला सांगितलं असतं. मात्र राजकारण केले जाते.” असंही अजित पवार म्हणाले.

“भाजप नेत्यांच्या पोटात दुखायला लागलं”

“कल्याणराव काळे पवार साहेबांकडे चालले, असं समजलं की भाजप नेत्यांच्या पोटात दुखायला लागलं. भाजपचे सगळेच कल्याणरावांच्या घरी जायला लागले. शरद पवार साहेबांचा कल्याणराव काळे यांना निरोप आहे, की भगीरथ चांगल्या मतांनी निवडून आला पाहिजे.” असं अजितदादांनी कल्याणरावांना सांगितलं.

पाहा संपूर्ण भाषण :

संबंधित बातम्या :

मधल्या काळात ट्रॅक चुकला, भाजपला टोले, कल्याणराव काळे अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत

(Ajit Pawar taunts man in Pandharpur who asked to remove Mask)

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर