AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: मला बळजबरीनं इंजेक्शन देण्याचा प्रयत्न, शिंदेंच्या गटातून परतलेल्या नितीन देशमुखांचा गंभीर आरोप

मंत्री एकनाथ शिंदेंसोबत सूरतला गेलो असलो तरीही मी शिवसेना कदापि सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी दिली.

Eknath Shinde: मला बळजबरीनं इंजेक्शन देण्याचा प्रयत्न, शिंदेंच्या गटातून परतलेल्या नितीन देशमुखांचा गंभीर आरोप
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jun 22, 2022 | 1:42 PM
Share

नागपूरः सत्तेसाठी आणि प्रतिष्ठेसाठी कोण-कुणाचा कधी घात करेल सांगता येत नाही. याचाच प्रत्यय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राचं सरकार चालवणाऱ्या आमदारांचीच (ShivSena MLA) पळवापळवी सुरु असून एकमेकांना धमक्या, जीवे मारण्याचे प्रयत्नही होत असल्याच्या बातम्या बाहेर येत आहेत. त्यातच अकोल्याचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केलेला खुलासा अत्यंत खळबळजनक आहे. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख हेदेखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत सूरतला गेले होते. तिथून परतण्याच्या मार्गावर असताना मला बळजबरीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. माझ्या शरीरावर, दंडावर इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र ईश्वरकृपेनं मी सुखरूप आहे, असा खळबळजनक आरोप नितीन देशमुख यांनी केलाय. देशमुख यांना हार्ट अटॅक आल्याचे सांगत त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज अकोल्यात परत जात असताना नितीन देशमुख यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला आणि आपल्यासोबत काय घडलं, याची आपबिती सांगितली.

काय म्हणाले नितीन देशमुख?

नितीन देशमुख यांच्याव काल मुंबईत उपचार झाले. आज ते आपल्या मतदार संघात अकोल्यात परत निघाले असून नागपूरमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘ त्या दिवशी (21 जून रोजी) रात्री बारा वाजता मी हॉटेलमधून निघालो. रात्री तीन रस्त्यावर उभा होतो. 100 ते 200 पोलीस माझ्या मागे होते. कुणीही माला वहानात बसू देत नव्हते. अखेर या पोलिसांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं.माझा बीपीही वाढला नव्हता. पण मला अटॅक आला हे सांगण्यामागे त्यांचा हेतू काय होता, हे माहिती नाही. 20-25 लोकांनी मला पकडून जबरदस्तीनं इंजेक्शन टोचलं. ते इंजेक्शन कोणतं होतं, काय होतं हे मला माहिती नाही. पण चुकीच्या पद्धतीनं शरीरावर प्रक्रिया करण्याचं त्यांचं षडयंत्र होतं. मला अटॅक आल्याचं परस्पर सांगण्यात आलं.  पण ईश्वर कृपेने मी नीट आहे… आता घरी जातोय.. अशी प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी दिली.

‘मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक’

मंत्री एकनाथ शिंदेंसोबत सूरतला गेलो असलो तरीही मी शिवसेना कदापि सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी दिली. नागपुरात परतल्यावर ते म्हणाले, ‘ मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे. मी सूरतला गेलो होते. तेथे आमचे मंत्री होते. मंत्र्यांसोबत मी गेलो होतो. पण मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा सैनिक आहे. आता घरी जातोय.

काल पत्नीची पोलिसात तक्रार

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीचा निकाल 20 जून रोजी रात्री लागल्यानंतर 21 जून रोजी नितीन देशमुख सकाळच्या वेळी अकोल्यात येणं अपेक्षित होतं. पण ते 21 जून रोजी संध्याकाळपर्यंत न आल्यानं तसंच त्यांचा फोनही बंद असल्यानं देशमुख यांची पत्नी प्रांजली यांनी पोलिसात तक्रार दिली होती. माझ्या पतीच्या जीवाला धोका असल्याचंही त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?