‘हे’ एक काम करा, उद्धव ठाकरे दौरा करणार नाहीत!, अंबादास दानवे यांचं एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज

विरोधकांना उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज दिलंय.

'हे' एक काम करा, उद्धव ठाकरे दौरा करणार नाहीत!, अंबादास दानवे यांचं एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज
Follow us
| Updated on: Oct 23, 2022 | 12:39 PM

औरंगाबाद : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या टायमिंगवर टीका केली जात आहे.त्यावर बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांना उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज दिलंय.

उध्दव ठाकरे यांचा हा दौरा जनतेसाठी आहे. त्यांच्या दौऱ्यावर विरोधक करत आहेत. पण मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगू इच्छितो की, तुम्ही शेतकऱ्यांना मदत जाहिर करा. आम्ही दौरा करणार नाही, असं अंबादास दानवे म्हणालेत.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, असं अंबादास दानवे म्हणालेत.

उद्धव ठाकरेंचा होत असलेला हा दौरा कुठलाही राजकीय दौरा नसून जनतेसाठीचा दौरा आहे. राज्य सरकारने दिवाळी शिधा वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. पण हा शिधा अद्यापही लोकांपर्यंत पोहोचलेला नाही.हे सरकार अतिशय असंवेदनशील आहे, असं अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.

सत्तारांची उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका

निश्चितपणे उद्धव ठाकरे यांनी दौरा केला पाहिजे. शेतकऱ्यांना त्यांच्या शिवसेनेकडून मदत पण द्यायला हवी. परंतू जर केवळ राजकारण करण्यासाठी येत असतील तर याला जनता माफ करणार नाही.आगामी जिल्हा परिषद महापालिकेत शेतकरी यांना उत्तर देतील, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका केली आहे.

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.