मनसे-भाजप महायुती होणार की नाही?, गुलाबराव पाटलांनी मुहूर्त सांगितला…

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या वाढत्या भेटी पाहता युतीच्या चर्चांना उधाण आलंय. त्यावर गुलाबराव पाटील बोलेते झालेत. पाहुयात..

मनसे-भाजप महायुती होणार की नाही?, गुलाबराव पाटलांनी मुहूर्त सांगितला...
Follow us
| Updated on: Oct 23, 2022 | 11:47 AM

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या वाढत्या भेटी पाहता युतीच्या चर्चांना उधाण आलंय. दोन दिवसाआधी हे तिन्ही नेते एकाच मंचावर दिसले. मनसेच्या वतीने दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा शिंदे आणि फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते. अशात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी युतीवर भाष्य केलंय.

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचं एकत्र येणं, स्वाभाविक असेल, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे तीन मोठे नेते पहिल्यांदा एकत्र आले नाहीत. तर याआधीही त्यांच्या भेटी झाल्या आहेत. युती होणार की नाही हे लवकरच कळेल. दिवाळीनंतर याबाबतची स्पष्टता येईल, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.

मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कवरच्या मनसेच्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तेव्हा राज ठाकरे आणि शिंदे-फडणवीस एकाच मंचावर पाहायला मिळाले.

याआधीही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी झाल्या आहेत. तसंच भाजप आणि शिंदेगटातील नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही, शिंदेगटाचे नेते तानाजी सावंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे.

राज ठाकरेंनी मागच्या काही दिवसांपासून हिंदुत्वावर अधिक आक्रमक भूमिका घेतली. त्यात या वाढत्या भेटींमुळे युतीच्या चर्चा होत आहेत. आता यावर गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.