अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईल : चंद्रकांत पाटील

अमितभाईंच्या (Amit Shah) पायगुणाने महाराष्ट्रात सरकार (Maharashtra Thackeray Sarkar) यायचं असेल तर येईल" असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईल : चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 12:50 PM

पुणे :अमितभाईंच्या पायगुणाने वैभववाडीतील 6 नगरसेवक गेले त्याचा काही संबंध नाही. अमितभाईंच्या (Amit Shah Sindhudurg) पायगुणाने महाराष्ट्रात सरकार (Maharashtra Thackeray Sarkar) यायचं असेल तर येईल. मी काही भविष्यकार नाही” असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. चंद्रकांत पाटील यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे गिरीश प्रभुणे (Girish Prabhune) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांची पिंपरी चिंचवडमध्ये सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. (Amit Shahs Maharashtra tour could be lucky for BJP, Says Chandrakant Patil)

अमित शाहांच्या पायगुणाने मविआ सरकार जावं; असं नारायण राणे म्हणाले होते. त्याला शिवसेनेने सामनातून उत्तर दिलं होतं. अमित शहा यांच्या पायगुणाने महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे सरकार जाईल अशी स्वप्ने पाहणाऱ्यांविषयी काय बोलावे? असा सवाल सेनेने उपस्थित केला होता.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

खरं बोलले की झोंबते, अमित शाह खरं बोलले ते फार झोंबले त्यामुळे ज्याला ज्याला जसं जमलं ज्यांनी माईल्ड प्रतिक्रिया काढली, त्यांना दम दिला गेला. दुसऱ्या दिवशी त्याच माणसाने पुन्हा स्ट्रॉंग प्रतिक्रिया द्यायची, त्यामुळे अमित शाह शिवसेनेबद्दल जे बोलले ते खरे होते, त्यामुळेच ते झोंबले.

सिंधुदुर्गातील नगरसेवक शिवसेनेत जाणे आणि अमित शाह यांचे वक्तव्य याचा कसलाही संबंध नाही,अमित शाहांच्या पायगुणाने सरकार जाणार असेल ते जाईल अमित शाह यांनी शिवसेना संपण्याची भाषा केली नाही, पण मागच्या 15 महिन्यात ज्या पद्धतीने सरकारचा कारभार चालला आहे, तो आमच्या सरकार वेळी राहिला असता, तर शिवसेना संपली असती, असं वक्तव्य त्यांनी केले आणि ही वस्तूस्तिथी असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेला आणि संजय राऊतांना पराचा कावळा करण्याची सवय आहे. भाजपला कुणाला घाबरण्याचे कारण नाही.

“अमित भाईंनी शिवसेना संपवण्याची भाषा करण्यापेक्षा शिवसेनेला असा सल्ला देणं, आवाहन करणं किंवा सरकार आहे. तेव्हा जुने हिशेब काढण्याचा तो मुद्दा होता. तरीही शिवसेनेला आणि संजय राऊतांना पराचा कावळा करण्याची सवय आहे. त्यामुळे ते शिवसेनेला संपवणार, मसनात गेले, काय काय बोलले”.

अमित भाई असं व्यक्तीमत्व आहे, भाजप हा पक्ष असा आहे कुणाला घाबरत नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही, जे बोलायचं ते छातीठोकपणे बोलतो. समोरच्याला टाकून बोलणं, लागून बोलणं अशी आमची संस्कृती नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

वैभववाडीमध्ये १७ पैकी १७ सदस्य भाजपचे आहेत, राणे साहेब भाजपचे नेते झाले, त्यांचा मुलगा आमदार झाले. १७ पैकी ६ नगरसेवक शिवसेनेत गेले हे जाणं येणं त्या त्या वेळी होत असतं. अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार येईल आणि वैभववाडीत ६ नगरसेवक गेले त्याचा काही संबंध नाही. अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईल, असं चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.

VIDEO : चंद्रकांत पाटील 

संबंधित बातम्या 

अमित शाहांच्या पायगुणाने मविआ सरकार जावं; राणेंची प्रार्थना

अमित शाह सिंधुदुर्गात आले तेव्हाच धक्का देणार होतो, पण…. विनायक राऊतांचा राणेंवर पलटवार

अमित शहांचा शिवसेनेवर थेट वॉर; ‘ऑपरेशन लोट्स’ की ‘मनसे’शी युती?; चाणक्य नीतीमागे दडलं काय? 

अमित शाहांच्या पायगुणात इतकीच ताकद असती तर…, सामनातून टीकेचे बाण

(Amit Shahs Maharashtra tour could be lucky for BJP, Says Chandrakant Patil)

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.