5

अमित शाह सिंधुदुर्गात आले तेव्हाच धक्का देणार होतो, पण…. विनायक राऊतांचा राणेंवर पलटवार

वैभववाडीचे नगरसेवक नितेश राणे यांच्या हटवादीपणाला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. | Vinayak Raut

अमित शाह सिंधुदुर्गात आले तेव्हाच धक्का देणार होतो, पण.... विनायक राऊतांचा राणेंवर पलटवार
सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एनएमसीची मान्यता
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 6:21 PM

सिंधुदुर्ग: नारायण राणे (Narayan Rane) यांची थोडीतरी लाज राखावी म्हणून आम्ही भाजपच्या सात नगरसेवकांचा पक्षप्रवेश दोन दिवस पुढे ढकलला. अन्यथा अमित शाह सिंधुदुर्गात आले त्याचदिवशी आम्ही भाजपला धक्का देऊ शकलो असतो, अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांनी राणे कुटुंबीयांवर पलटवार केला. (Vinayak Raut slams Rane family)

नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांनी केलेल्या जहरी टीकेनंतर विनायक राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी वैभववाडीचे नगरसेवक नितेश राणे यांच्या हटवादीपणाला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सांगितले. यानंतर भाजपचे जिल्ह्यातील आणखी पदाधिकारी शिवसेनेत येतील, असा दावाही विनायक राऊत यांनी केला.

निलेश राणेंच्या धमकीवर काय म्हणाले राऊत….

निलेश राणे यांच्या बकवासगिरीला कोकणातील जनतेने एकदा नव्हे तर दोनदा धडा शिकवला आहे. मारामारी, शिवीगाळ, अरेरावी आणि हाणामारीची भाषा निलेश राणे यांनाच शोभते. ती भाषा इतरांना शोभत नाही. कोकणवासीय सुज्ञ आहेत. ते निलेश राणे यांना पुन्हा एकदा धडा शिकवतील, असे राऊत यांनी म्हटले.

‘मोदींनी शेतकऱ्यांची थट्टा उडविली’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लाखो शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. आंदोलक शेतकऱ्यांना मोदींनी आंदोलनजीवी म्हणून संबोधले. तुम्ही शेतकऱ्यांची अशी थट्टा करत असाल तर शेतकरी तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असेही विनायक राऊत यांनी म्हटले.

नितेश राणेंचं शिवसेनेला व्हॅलेंटाईन गिफ्ट, काय म्हणाले विनायक राऊत

नारायण राणे आणि नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गिफ्ट देण्याची कुवत आज तरी राहिलेली नाही. त्यांनी कितीही गिफ्ट देऊ केली तरी शिवसेनेला त्याची गरज नाही. शिवसेना पक्षप्रमुखांनी आपल्या मनाचा मोठेपणा किती आहे तो दाखवून दिला. तुम्ही शिवसेनेशी बेईमानी केली तरी तुमच्या मेडीकल कॉलेजचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच मंजूर केला. त्यामुळे अजूनतरी शिवसेनेवर तुमच्याकडून गिफ्ट स्वीकारण्याची वेळ आली नाही, असे राऊत यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

सिंधुदुर्गातील मेडिकल कॉलेजसंदर्भातील परवानग्यांसाठी भाजप नेते नारायण राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन

कोकणात दोन खासदारांचा राडा, मंत्र्यांची मध्यस्थी

शाह विश्वासघातकी, फडणवीसांच्या हट्टामुळे युती तुटल्याचं भाजपच्या दिल्लीश्वरांनाही मान्य : विनायक राऊत

(Vinayak Raut slams Rane family)

Non Stop LIVE Update
सरकार सकारात्मक, उपोषण सोडा, मुख्यमंत्री शिंदे यांची कुणाला विनंती?
सरकार सकारात्मक, उपोषण सोडा, मुख्यमंत्री शिंदे यांची कुणाला विनंती?
ते आमचे सहकारी; पण... स्वप्न पहात आहेत, अनिल देशमुख यांची टीका कुणावर?
ते आमचे सहकारी; पण... स्वप्न पहात आहेत, अनिल देशमुख यांची टीका कुणावर?
शरद पवार यांच्या फोटोवरून हा नेता म्हणाला, 'कुणाकडे नाराजी...?'
शरद पवार यांच्या फोटोवरून हा नेता म्हणाला, 'कुणाकडे नाराजी...?'
'त्या ५० आमदारांमध्ये माझं नाव नाही 'मी' भाग्यवान', आमदाराने सांगितलं
'त्या ५० आमदारांमध्ये माझं नाव नाही 'मी' भाग्यवान', आमदाराने सांगितलं
घरगुती देखाव्यातून उलगडली तंतुवाद्यांच्या माहेरघराची यशोगाथा
घरगुती देखाव्यातून उलगडली तंतुवाद्यांच्या माहेरघराची यशोगाथा
बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रवीण दरेकर म्हणाले...
बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रवीण दरेकर म्हणाले...
प्रकाश आंबेडकरांचं लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले..
प्रकाश आंबेडकरांचं लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले..
चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर फडणवीस म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर फडणवीस म्हणाले...
'... भाजपनं माफी मागावी', सुप्रिया सुळेंचा बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल
'... भाजपनं माफी मागावी', सुप्रिया सुळेंचा बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल
राज ठाकरे 'वर्षा'वर, मुख्यमंत्री शिंदेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन अन्..
राज ठाकरे 'वर्षा'वर, मुख्यमंत्री शिंदेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन अन्..