शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये; अमोल कोल्हेंची चंद्रकांतदादांवर टीका

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे. (amol kolhe criticized chandrakant patil over sharad pawar statement)

शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये; अमोल कोल्हेंची चंद्रकांतदादांवर टीका

पुणे: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे. शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये, अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी चंद्रकांतदादांवर हल्ला चढवला आहे. (amol kolhe criticized chandrakant patil over sharad pawar statement)

पुणे पदवीधर निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थित पिंपरी-चिंचवडमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अमोल कोल्हे यांनी ही घणाघाती टीका केली. काल भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. मला भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करायची नाही. पण शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये, अशी टीका करतानाच तुम्ही निखारा टाकला तर आम्ही वणवा पेटवू, असा इशारा कोल्हे यांनी दिला. देशात त्यांचा वरचष्मा आहे असं त्यांना वाटतंय. त्यामुळे त्यांना आता इंगा दाखवण्याची वेळ आली आहे, असंही ते म्हणाले.

शरद पवार हे अभ्यास नसलेले छोटे नेते असल्याची टीका पाटील यांनी केली होती. राजकारणात येण्यापूर्वी पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचं दिसून आलं. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका करतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र अभ्यासू नेते आहेत, असं पाटील म्हणाले होते. तसेच विधान परिषदेच्या जागा जिंकण्यासाठी जे करता येईल ते करा, असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यावर कोल्हे यांनी पलटवार केला आहे. (amol kolhe criticized chandrakant patil over sharad pawar statement)

संबंधित बातम्या:

राज्य सरकार घोषणा करतं आणि पलटतं, त्यांची भूमिका लोकविरोधी, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

भाजप सर्व निवडणुका स्वबळावर लढणार; फडणवीसांनी मनसेसोबत युतीची शक्यता फेटाळली

जे. पी. नड्डा यांचा 120 दिवसांचा देशभर प्रवास, भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं!

(amol kolhe criticized chandrakant patil over sharad pawar statement)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *