Amravati MLC Result : अमरावती शिक्षक मतदारसंघाचा निकाल काही तासावर, कोण मारणार बाजी? वाचा कोणता झाली लढत?

27 ऑक्टोबर रोजी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या पाच जागांसाठीची निवडणूक सत्ताधारी महायुती तसेच विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली होती. काही मतदारसंघांमध्ये तर बंडखोरीही झाली.

Amravati MLC Result : अमरावती शिक्षक मतदारसंघाचा निकाल काही तासावर, कोण मारणार बाजी? वाचा कोणता झाली लढत?
amravati teacher constituency election result
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 26, 2026 | 10:21 PM

Amravati Graduate Constituency Election Result : राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगली. या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. आता 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या पाच जागांसाठीची निवडणूक सत्ताधारी महायुती तसेच विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली होती. काही मतदारसंघांमध्ये तर बंडखोरीही झाली. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली. त्यामुळेच या निवडणुकीत कोणाचा वरचष्मा राहणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान , या पाच जागांपैकी अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली. या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना अशा महायुतीच्या दोन पक्षात बंडखोरी झाली. त्यामुळे या जागेवर कोणाकोणात लढत झाली? तसेच प्रचाराच्या काळात नेमकं काय घडलं? हे जाणून घेऊ या…

अमरावती मतदारसंघात कोणाकोणामध्ये लढत झाली?

अमरावती शिक्षक मतदारसंघात अदिती पोहरे (काँग्रेस) दत्तात्रय लहाने (ठाकरे गट), किरण सरनाईक (शिवसेना), दिलीप कड (विदर्भ.माध्यमिक.शिक्षक संघ) या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत झाली. परंतु याच जागेत बंडखोरीही पाहायला मिळाली. शिवसेना पक्षातील श्रीकांत देशपांडे (माजी आमदार) भाजपाचे आमदार राजेश वानखेडे यांचे मेहुणे शेखर भोयर, भाजप आमदार उमेश यावलकर यांचे निकटवर्तीय सुमित पवार, भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या बहीण संगीता शिंदे यांनी बंडखोरी करत या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी किंवा चौरंगी राहिली.

Loading...

निवडणुकीच्या काळात एकमेकांवर आरोप

अमरावती शिक्षक मतदारसंघात एकूण 35810 मतदार आहेत. प्रचाराच्या काळात उमेदवारांनी एकमेकांवर गंभीर आरोप केल्याचे दिसून आले. पैठणी, कुरिअर किंवा रोख रक्कम देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असाही दावा करण्यात आला. त्यामुळे मतदारांनी नेमकं कोणाच्या पारड्यात मतं टाकली? आपले प्रश्न विधिमंडळात कोण प्रभावीपणे मांडू शकतो, असे मतदारांना वाटते, हे आता काही तासात स्पष्ट होणार आहे. 27 ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच मतमोजनीला सुरुवात होणार आहे. दुपारपर्यंत निवडणुकीचा कल स्पष्ट होऊ शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us