AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार नवनीत कौर राणा यांच्या सासऱ्यांना कोरोनाची लागण

गंगाधर राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने राणा कुटुंबातील सदस्य, कार्यकर्ते अशा 50 ते 60 जणाची कोरोना चाचणी घेण्यात येत आहे

खासदार नवनीत कौर राणा यांच्या सासऱ्यांना कोरोनाची लागण
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Aug 02, 2020 | 7:07 PM
Share

अमरावती : बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांचे वडील, म्हणजेच अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या सासऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. (Amravati MP Navneet Rana Father in Law MLA Ravi Rana’s Father tested Corona Positive)

गंगाधर राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने राणा कुटुंबातील सर्व सदस्य, तसेच कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणाची कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. आमदार रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

दरम्यान, कोव्हिड लॅबमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार दोनच दिवसांपूर्वी अमरावतीत उघडकीस आला होता. त्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा चांगल्याच संतप्त झाल्या. नवनीत राणा यांनी पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.

“अमरावती येथील आरोग्य यंत्रणा पार ढासळली आहे. कोव्हिड रुग्णांचे हाल होत आहेत. कोव्हिड तपासणी करणाऱ्या खाजगी, कंत्राटी व्यक्तींची पार्श्वभूमी तपासून पाहली पाहिजे” असेही खासदार नवनीत राणा म्हणाल्या होत्या.

हेही वाचा : ‘त्या’ माऊलीचा हंबरडा ऐकून नवनीत राणाही गहिवरल्या

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि धान्य वाटण्यासाठी एप्रिल महिन्यात दौरे केले होते. नवनीत कौर राणाही यामध्ये सहभागी होत्या. त्यावेळी (एप्रिल महिन्यात) रवी राणा यांना 103-104 या श्रेणीत ताप आला. त्यामुळे त्यांच्या शरीरभर असह्य वेदना जाणवू लागल्या होत्या. तेव्हा त्यांना खासगी रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यात आले होते, परंतु त्यांना कोरोनाची लागण झाली नव्हती.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

नवनीत कौर राणा या अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर अपक्ष निवडून गेल्या आहेत. शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचा धुव्वा उडवत नवनीत कौर निवडून आल्या आहेत. तर त्यांचे यजमान आणि युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणा हे बडनेरा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदारपदी निवडून आले आहेत. त्यांनीही शिवसेना उमेदवाराचाच पराभव केला. शिवसेनेच्या संजय बंड यांच्या पत्नी प्रिती यांना रवी राणांनी पराभवाची धूळ चारली होती. (Amravati MP Navneet Rana Father in Law MLA Ravi Rana’s Father tested Corona Positive)

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर