सरकार अस्थिर करण्यासाठी विरोधकांचं षडयंत्र, अडसूळांवरील कारवाईवरुन वडेट्टीवारांचा घणाघात

| Updated on: Sep 27, 2021 | 2:53 PM

महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी या कारवाया सुरु आहेत. हे विरोधकांनी रचलेलं षडयंत्र आहे. खासदार नवनीत राणा यांच्या जात पडताळणीबाबत कारवाई झाली. त्यामुळे त्यांनी अडसूळ यांच्या विरोधात तक्रार दिली. पण हे सरकार आता फेविकॉलचा जोड बनलं आहे. त्यामुळे काही फरक पडणार नाही, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

सरकार अस्थिर करण्यासाठी विरोधकांचं षडयंत्र, अडसूळांवरील कारवाईवरुन वडेट्टीवारांचा घणाघात
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री
Follow us on

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या मागे सध्या ईडीचे शुक्लकाष्ट लागले आहे. कारण, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे चिरंजीव अभिजीत अडसूळ यांची ईडीकडून चौकशी सुरु होती. काही तास चौकशी केल्यानंतर ईडीने आनंदराव अडसूळ यांना ताब्यात घेतलं, त्यावेळी त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना गोरेगावच्या लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या कारवाईवरुन काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी या कारवाया सुरु असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. (Vijay Vadettiwar criticizes BJP over ED action against Anandrao Adsul)

महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी या कारवाया सुरु आहेत. हे विरोधकांनी रचलेलं षडयंत्र आहे. खासदार नवनीत राणा यांच्या जात पडताळणीबाबत कारवाई झाली. त्यामुळे त्यांनी अडसूळ यांच्या विरोधात तक्रार दिली. पण हे सरकार आता फेविकॉलचा जोड बनलं आहे. त्यामुळे काही फरक पडणार नाही, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय. सुपारी घेऊन काही लोक काम करतात. ती सुपारी चघळली जात नाही तोपर्यंत ते काम करणार, असा टोलाही वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांना लगावलाय.

आनंदराव अडसूळांची चौकशी

दरम्यान, आनंदराव अडसूळ यांना ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती कळतीय. सकाळी त्यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. चौकशीसाठी ईडीचे अधिकारीही त्यांच्या घरी दाखल झाले होते. अखेर तीन ते चार तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याचवेळी अडसूळ यांची तब्येत बिघडली आहे. त्यांच्या मुंबईतल्या घरी तातडीने अॅम्ब्युलन्स बोलाविण्यात आली आहे. गोरेगावच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत 900 कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी आज त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर पावणे अकराच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येतीय.

2 हेक्टरपर्यंत 13 हजार 600 रुपये आर्थिक मदत?

अतिवृष्टीमुळे राज्यातील मराठवाड्यासह काही भागात मोठं नुकसान झालं आहे. 82 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. 8 दिवसांत सर्व पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. NDRFच्या निकषानुसार 2 हेक्टरपर्यंत 13 हजार 600 रुपये आर्थिक मदत करणार आहोत, असं आश्वासन यावेळी वडेट्टीवार यांनी दिलंय. 7 हजार कोटी रुपयांचा मेमोरँडम केंद्र सरकारला पाठवला आहे. त्यांनी मदत करणं अपेक्षित आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.

राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी इमारती भाडे तत्त्वावर घेऊन 72 हॉस्टेल सुरु करणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. धनगर, एनटी, व्हीजेएनटी यांनाही ओबीसीतून सुविधा दिल्या जातील, असं वडेट्टीवार म्हणाले.

इतर बातम्या :

आधी फडणवीस म्हणाले, आरोग्य भरतीत दलालांचा सुळसुळाट, आता व्हायरल Audio Clip ने शंका वाढवली

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा जबाब नोंदवला; नाशिक पोलिसांच्या ऑनलाइन प्रश्नांना दिली खोचक उत्तरे!

Vijay Vadettiwar criticizes BJP over ED action against Anandrao Adsul