मुंबई: राज्यात आरोग्य सेवा भरती घोटाळ्यात मोठा घेटाळा होत असल्याचा आरोप ओबीसी नेता प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. प्रकाश शेंडगे यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. आरोग्य भरतीसंदर्भात मध्यस्थ आणि दलाल यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होतं आहे. व्हायरल होत असलेल्या क्लिपची टीव्ही 9 मराठी पष्टी करत नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दलाल घुसल्यामुळेच आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याचा संशय व्यक्त केला होता. विद्यार्थ्यांकडे 5, 10 ते 15 लाख रुपयांची मागणी करुन, भरती करण्याचं आश्वासन दिलं जात आहे. त्यामुळे परीक्षा रद्द का झाली याची तर चौकशी व्हायलाच हवी, पण या दलालांचाही शोध घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं शंका वाढल्याचं बोललं जातंय.