आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांना त्रास झाला, मनापासून माफी मागतो, आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

शासनाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी संताप व्यक्त करतायत. परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांना त्रास झाला, मनापासून माफी मागतो, आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
राजेश टोपे, आरोग्यमंत्री

मुंबई : आरोग्य विभागाची उद्या आणि परवा होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिलीय. या बातमीनंतर विद्यार्थ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा या परजिल्ह्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकजण खबरदारी म्हणून आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. तर काही विद्यार्थी अजूनही प्रवासात आहेत. शासनाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी संताप व्यक्त करतायत. परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

परीक्षा ऐनवेळी रद्द

राज्यात आज आणि उद्या (शनिवार आणि रविवार ता. 25 आणि 26 सप्टें) आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. मात्र ही परीक्षा राज्यात होत असताना काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर परीक्षा केंद्र ही इतर राज्यांतील आली आहेत. “एका विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आलं आहे. त्यामुळे उद्याच्या परीक्षेबाबत परीक्षार्थींमध्ये एकच गोंधळ उडाला होता. ही समस्या केवळ एकाच विद्यार्थ्याला आली असून त्याचे हॉल तिकीट तात्काळ दुरुस्त केलं आहे”, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते. कुठल्याही परिक्षार्थींची गैरसोय होणार नाही अशा प्रकारे नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यानंतरही परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

 हॉल तिकीट गोंधळावर राजेश टोपे यांचं स्पष्टीकरण

राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि आज परीक्षा केंद्रांवर पाहणी करून कुठल्याही परीक्षार्थींची गैरसोय होऊ देणार नसल्याचं सांगितलं होतं. परभणीतील रावसाहेब जामकर महिला महाविद्यालयात असलेल्या परीक्षा केंद्राची राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह पाहणी केली आहे आणि व्यवस्थेचा आढावा घेतला होता.

ऐनवेळी परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना नाहक त्रास

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, ” केवळ एका विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटावर परीक्षा केंद्राचा पत्ता चुकला होता, तो तात्काळ दुरुस्त करण्यात आला आहे. आठ लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसत असून त्याच्या योग्य प्रकारच्या नियोजनासाठी बाह्य स्त्रोत नेमण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट्स डाऊनलोड होत नाहीत त्यांना ईमेल्स केले जात आहेत, व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सिव्हिल सर्जनना याबाबत अधिकार देण्यात आले असून ते अशा विद्यार्थ्यांना मदत करतील, अशी सर्व तयारी झाली असल्याचे सांगितले जात असताना ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

(Rajesh Tope First Comment On Maharashtra health department recruitment exam postponed)

हे ही वाचा :

maharashtra health department recruitment 2021 | आरोग्य विभागाची भरती परीक्षा पुढे ढकलली ! तांत्रिक अडचणींमुळे निर्णय, विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI