AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

maharashtra health department recruitment 2021 | आरोग्य विभागाची भरती परीक्षा पुढे ढकलली ! तांत्रिक अडचणींमुळे निर्णय, विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

maharashtra health recruitment 2021 |येत्या 26 सप्टेंबर रोजी होणारी आरोग्य विभागाची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. सातत्याने उद्भवणाऱ्या तांत्रिक चुकांमुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली आहे. विशेष म्हणजे काही परीक्षार्थी आपापल्या परीक्षा केंद्रावर जाऊन पोहोचले आहेत.

maharashtra health department recruitment 2021 | आरोग्य विभागाची भरती परीक्षा पुढे ढकलली ! तांत्रिक अडचणींमुळे निर्णय, विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ
health department exam
| Updated on: Sep 26, 2021 | 6:44 PM
Share

मुंबई : येत्या 26 सप्टेंबर रोजी होणारी आरोग्य विभागाची भरती परीक्षा (health department recruitment 2021 exam) पुढे ढकलण्यात आली आहे. सातत्याने उद्भवणाऱ्या तांत्रिक चुकांमुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली आहे. विशेष म्हणजे काही परीक्षार्थी आपापल्या परीक्षा केंद्रावर जाऊन पोहोचले आहेत. असे असताना ऐनवेळी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे आता चांगलाच गोंधळ उडाला आहे. परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागत असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. (maharashtra government cm uddhav thackeray and rajesh tope postponed maharashtra health department recruitment 2021 exam)

मेसेजद्वारे आरोग्य विभागाचा निरोप कळवला

आरोग्य विभागातर्फे घेण्यात येणारी परीक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. परीक्षेसाठी उमेदवारांनी पूर्णपणे तयारी केली होती. मात्र ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय आज अचानकपणे घेण्यात आला आहे. ही परीक्षा पुन्हा कधी घेण्यात येईल, याबाबत सध्यातरी कोणतीही माहिती देण्याता आली नाही. मात्र, परीक्षार्थिंना मेसेजद्वारे हा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. परीक्षा दोन दिवसांवर असताना हा निर्णय घेतल्यामुळे परीक्षार्थी संताप व्यक्त करत आहेत. तसेच अचानकपणे ही परीक्षा पुढे ढकलल्यामुळे आता नेमके काय करावे असा प्रश्न परीक्षार्थींना पडला आहे.

सहा हजार दोनशे पदांसाठी परीक्षा

आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील 2739 आणि गट ड संवर्गातील 3466 अशा एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यासाठी राज्यातील 1500 केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार होती. ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत केली जात आहे. उत्तर पत्रिकांची तपासणी संगणक प्रणालीद्वारे केली जाणार आहे.

नंतर परीक्षा कधी होणार ? 

आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर जाऊन पोहोचले आहेत. असे असताना परीक्षा रद्द झाल्यामुळे काय करावे ? आता परीक्षा पुढे ढकलण्यात आली असली तरी ही परीक्षा नंतर कधी होणार ? असे गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभे ठाकले आहेत. सराकरने परीक्षा पुढे ढकसली असली तरी नंतर ही परीक्षा नेमकी कधी होणार याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे परीक्षा नेमकी कधी होणार याचे उत्तर सध्यातरी कोणाकडेही नाही.

परीक्षा पुढे ढकलण्याचे कारण काय ? 

आरोग्य विभागातील भरती परीक्षा पुढे ढकलल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. यामागे सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे कारण देण्यात आलेले आहे. तशा काही तक्रारीसुद्धा समोर आल्या होत्या. काही विद्यार्थ्यांना तर थेट परराज्यातील परीक्षा केंद्र देण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांना अदापही प्रवेशपत्र मिळालेले नाही. काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर फोटो, केंद्र आणि वेळ देण्यात आलेला नाही. तसेच दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणं शक्य नाही, अशा काही अडचणी समोर आल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आसावा.

हा गोंधळ मी पहिल्यांदाच पाहतोय, निर्णय चुकीचा- बच्चू कडू

परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी गंभीर टीका केलीआहे.  हा निर्णय चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “चुकीचा निर्णय आहे. हा गोंधळ मी पहिल्यांदाच पाहतोय. वाशिमच्या विद्यार्थ्याला नाशिकचं सेंटर दिलं गेलं. काही अडचण आली तर त्यासाठी 6 नंबर दिले गेले आहेत. ते उचलले जात नाहीत. आतापर्यंत मला 500 पेक्षा जास्त फोन आले आहेत. परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर सांगितलं जातं की परीक्षा रद्द झाली. हे चुकीचं आहे. प्रशासनातील जे दोषी आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,” असा शब्दात बच्चू कडू यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.

 विद्यार्थ्यंच्या आयुष्याशी खेळ चालवला आहे का ?

राज्य सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकाला घेरलं आहे. “बच्चू कडू यांनी सत्तेत असतानाही नाराजी व्यक्त करत आहेत. त्यावरुन सरकारचा किती निष्काळजीपणा आहे हे दिसून येतं. सर्वसामान्य कुटुंबातील मुलं हजारो रुपये खर्च करून सेंटरवर जातात, तेव्हा कळतं की परीक्षा नाही. काय विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ लावला आहे काय? अशा प्रकारचा बेजबाबदारपणा माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. विद्यार्थ्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही संताप व्यक्त करा. सरकार दरबारी आमचं गाऱ्हाणं मांडा. कंपनीवर कारवाई करण्यापेक्षा त्या खात्याचा मंत्र्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. तुम्हाला वाटलं की परीक्षा केंद्रं चुकीची टाकणार, तुम्हाला वाटलं ही परीक्षा रद्द करणार. विद्यार्थ्यांचं आयुष्य फुलायच्या काळात तुम्ही त्यांच्यावर असा अन्याय करत आहात. महाविकास आघाडी सरकार या सगळ्या प्रकाराला जबाबदार आहे,” अशी संतप्त प्रक्रिया दरेकर यांनी दिलीय.

इतर बातम्या :

परीक्षा महाराष्ट्रासाठी, सेंटर उत्तर प्रदेश ! आरोग्य विभागाच्या भरती प्रकियेचा गोंधळ सुरुच, विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच

(maharashtra government cm uddhav thackeray and rajesh tope postponed maharashtra health department recruitment 2021 exam)

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.