केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा जबाब नोंदवला; नाशिक पोलिसांच्या ऑनलाइन प्रश्नांना दिली खोचक उत्तरे!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा ऑनलाइन जबाब नाशिक पोलिसांनी (Nashik Police) नोंदवला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा जबाब नोंदवला; नाशिक पोलिसांच्या ऑनलाइन प्रश्नांना दिली खोचक उत्तरे!
नारायण राणे, केंद्रीय मंत्री
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 1:55 PM

नाशिकः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा ऑनलाइन जबाब नाशिक पोलिसांनी (Nashik Police) नोंदवला आहे. (Nashik Police recorded the reply of Union Minister Narayan Rane regarding the offensive statement made about Chief Minister Uddhav Thackeray)

राणे यांनी एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी नाशिक पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. राणे यांच्याविरोधात शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर राणे यांना अटक झाली. त्यांना महाड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे हजर करण्यात आले होते. राणे यांना दंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने 17 सप्टेंबर पर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश राज्य सरकारला दिले होते. यापूर्वी गणेशोत्सव असल्यामुळे 2 सप्टेंबर रोजी उपस्थित राहता येणार नसल्याचे पत्र राणे यांच्या वकिलांनी नाशिक पोलिसांना पाठविले होते. नाशिक पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वकिलांशी संवाद साधला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 25 सप्टेंबर रोजी राणे यांचा ऑनलाइन जबाब नोंदवण्याचे ठरले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोलिसांसमोर ऑनलाइन जबाब नोंदवला. पोलीस आयुक्त दीपक पांडेय, उपआयुक्त संजय बारकुंड यांच्यासमोर हा जबाब झाला. यावेळी पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना नारायण राणे यांनी आपल्या तिरकस शैलीत खोचक उत्तरे दिल्याचे समजते.

अन् जीभ घसरली…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली खेचली असती, अशी भाषा केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. या वक्तव्याचा निषेध करत युवासेना आणि शिवसेनेने मुंबईतील नारायण राणे यांच्या घरासमोर वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वात जोरदार निर्देशने केली होती. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणीही गुन्हा दाखल झाला होता.

राजकीय खडाजंगी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याविरोधात शिवसेना आणि युवासेना आक्रमक झाली होती. त्यांच्या वक्त्वव्याचा निषेध करत राज्यभर आंदोलने करण्यात आली. या प्रकरणावर नारायण राणे यांनी जामीन मिळाल्यानंतर पत्रकार परिषद घेत सविस्तर म्हणणे मांडले. येत्या काळात शिवसेनेची प्रकरणे चव्हाट्यावर आणू, असा इशारा दिला होता. मात्र, तूर्तास तरी हे प्रकरण शांत झाले आहे. आगामी काळात राज्यात अनेक महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यावेळी पुन्हा एकदा राजकीय खडाजंगी पाहायला मिळू शकते. (Nashik Police recorded the reply of Union Minister Narayan Rane regarding the offensive statement made about Chief Minister Uddhav Thackeray)

इतर बातम्याः

बहुचर्चित कथित धर्मांतरणासाठी परदेशातून फंडिंग; नाशिकच्या तरुणाच्या खात्यात तब्बल 20 कोटी जमा

मरणानेही छळले होते! नाशिक जिल्ह्यात स्मशानभूमी नसल्याने ताडपत्री धरून तरुणावर अंत्यसंस्कार

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....