Anil Deshmukh Resign : उद्धव ठाकरे सरकारने नैतिकता गमावली, केंद्रीय कायदामंत्र्यांचा हल्लाबोल

केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी ठाकरे सरकावर टीका केलीय. अनिल देशमुख प्रकरणात उद्धव ठाकरे सरकारनं आपला नैतिक अधिकार गमावल्याचा घणाघात प्रसाद यांनी केलाय.

Anil Deshmukh Resign : उद्धव ठाकरे सरकारने नैतिकता गमावली, केंद्रीय कायदामंत्र्यांचा हल्लाबोल
केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना टोला

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतरही केंद्रीय भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी ठाकरे सरकावर टीका केलीय. अनिल देशमुख प्रकरणात उद्धव ठाकरे सरकारनं आपला नैतिक अधिकार गमावल्याचा घणाघात प्रसाद यांनी केलाय. (Ravi Shankar Prasad criticizes CM Uddhav Thackeray and NCP President Sharad Pawar)

बाकी मंत्र्यांचं टार्गेट किती?

आम्ही सुरुवातीपासूनच या सर्व प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्याची मागणी करत होतो. हा तपास मुंबई पोलिसांमार्फत शक्य नव्हता. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला मुंबईतील रेस्टॉरंट आणि बारमधून महिन्याला 100 कोटीच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं. आम्ही हा विषय उचलून धरला की हे टार्गेट फक्त मुंबई पुरतं मर्यादित आहे की पूर्ण महाराष्ट्रासाठी असं टार्गेट दिलं जातं? हे टार्गेट एका मंत्र्याचं होतं तर बाकी मंत्र्याचं टार्गेट काय? असा प्रश्नही प्रसाद यांनी पुन्हा एकदा विचारला आहे.

उद्धव ठाकरे मौन कधी सोडणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मौन बाळगून आहेत. शरद पवार सांगतात की मंत्र्यांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री करतील. तर काँग्रेस शिवसेना सांगते की देशमुखांबाबतचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस घेईल. आज तर कमालच झाली, शरद पवार यांनी परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवण्यात आला, असा टोलाही रविशंकर प्रसाद यांनी लगावलाय.

आम्हाला हे माहिती होतं की, शरद पवार यांच्या इशाऱ्यावरच ते राजीनामा देणार वा नाही देणार. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी बोलणार? त्यांचं मौन अनेक प्रश्न उपस्थित करत आहे, असा टोलाही प्रसाद यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

संबंधित बातम्या :

गृहमंत्र्यांचा राजीनाम्यानंतर मुख्यमंत्र्याच्या नैतकितेवर प्रश्नचिन्ह, भाजपच्या बड्या नेत्याची खोचक टीका

आता नवा वसुली मंत्री कोण? अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ कडाडल्या

Ravi Shankar Prasad criticizes CM Uddhav Thackeray and NCP President Sharad Pawar

Published On - 5:46 pm, Mon, 5 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI