AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गृहमंत्र्यांचा राजीनाम्यानंतर मुख्यमंत्र्याच्या नैतकितेवर प्रश्नचिन्ह, भाजपच्या बड्या नेत्याची खोचक टीका

भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे. राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेवर थेट प्रश्न उपस्थित केला आहे. (nitesh rane uddhav thackeray anil deshmukh)

गृहमंत्र्यांचा राजीनाम्यानंतर मुख्यमंत्र्याच्या नैतकितेवर प्रश्नचिन्ह, भाजपच्या बड्या नेत्याची खोचक टीका
नितेश राणे, उद्धव ठाकर, अनिल देशमुख
| Updated on: Apr 05, 2021 | 4:28 PM
Share

मुंबई : उच्च न्यायालयाने अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना सीबीआयकडून प्राथमिक चौकशी करण्यात येणार असल्यामुळे गृहमंत्रिपदावर असणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. हाच मुद्दा घेऊन भाजप नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) यांच्यावर शाब्दिक  हल्ला केला आहे. राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेवर थेट प्रश्न उपस्थित केला आहे. परमबीर सिंह यांनी ज्यांना 100 कोटींबद्दल माहिती दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय ? असा खोचक सवाल त्यांनी केलाय. (Nitesh Rane criticizes CM Uddhav Thackeray on Anil Deshmukh resignation)

“नैतिकता फक्त अनिल देशमुखांकडेच आहे अस दिसतंय. ज्यांना परमवीर सिंह यांनी 100 कोटींबद्दल माहिती दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय ? मीठी नदीत तर शोधायला लागणार नाही ना ?? ” असं राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केलेले आहेत. देशमुखांकडून निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश देशमुखांनी दिले होते, असा ओरोप सिंग यांनी केलेला आहे. त्यावर अॅड. जयश्री पाटील यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने या प्रकरणाची सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश दिले. याबाबतचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे सांगण्यात आले. त्यानंतर देशमुख यांनी नैतिकतेच्या दृष्टीकोनातून गृहमंत्रिपदाचा राजीमाना दिला.

राजीनामा देण्याआधी राष्ट्रवादीची दोन तास खलबतं

कोर्टाचा निर्णय आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोजक्याच नेत्यांची शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, नवाब मलिक आणि स्वत: अनिल देशमुखही उपस्थित होते. यावेळी देशमुख यांनी राजीनामा द्यावा की देऊ नये याबाबत सुमारे दोन तास खलबतं झाली. त्यानंतर देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

दरम्यान, देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर  नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे खळबळ उडाली आहे. याआधीसुद्धा देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपानंतर ठाकरे यांनीसुद्धा राजीनामा द्यावा, अशी मागणी नितेश राणे यांनी केलेली आहे.

इतर बातम्या :

Maharashtra Home Minister Resign| एक प्रकरण, ज्यामुळे अजित पवार गृहमंत्रिपदाच्या रेसमध्ये नसतात!

Anil Deshmukh resign: अनिल देशमुख यांचं राजीनामा पत्र जसंच्या तसं

सचिन वाझेंचे बॉस अजून सापडलेले नाहीत; आता मुख्यमंत्री का बोलत नाहीत, देवेंद्र फडणवीसांचा सवाल

(Nitesh Rane criticizes CM Uddhav Thackeray on Anil Deshmukh resignation)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.