Anil Parab : अनिल परबांच्या अडचणी आणखी वाढणार? केद्राच्या पर्यावरण टीमकडून साई रिसॉर्टची पाहणी, नेमकं काय हाती लागलं?

| Updated on: Jul 14, 2022 | 6:18 PM

अशातच आता अनिल परब यांच्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. कारण आज पुन्हा केंद्रातली एक टीम दापोलीतल्या रिसॉर्टवर दाखल झाली आहे आणि त्यांच्याकडून या रिसॉर्टची पाहणी सुरू आहे.

Anil Parab : अनिल परबांच्या अडचणी आणखी वाढणार? केद्राच्या पर्यावरण टीमकडून साई रिसॉर्टची पाहणी, नेमकं काय हाती लागलं?
अनिल परबांच्या अडचणी आणखी वाढणार? केद्राच्या पर्यावरण टीमकडून साई रिसॉर्टची पाहणी, नेमकं काय हाती लागलं?
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : दापोलीतलं साई रिसॉर्ट (Sai Resort) हे बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजप नेते किरण सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याकडून वारंवार करण्यात येते आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वीच अनिल परब यांची (Anil Parab) केंद्रीय तपासणी यंत्रणांकडून याचवरून चौकशीही झाली होती. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांनी दापोलीत दाखल होत या रिसॉर्टची पाहणी केली होती. तसेच मुरुड ग्रामपंचायतीकडून काही कागदपत्र ही या रिसॉर्ट संबंधी आपल्या ताब्यात घेतली होती. तर हे रिसॉर्ट माझं नाही, या रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही, असे आम्ही परब वारंवार सांगत आहेत. अशातच आता अनिल परब यांच्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. कारण आज पुन्हा केंद्रातली एक टीम दापोलीतल्या रिसॉर्टवर दाखल झाली आहे आणि त्यांच्याकडून या रिसॉर्टची पाहणी सुरू आहे.

केंद्रातल्या टीमकडून रिसॉर्टची पाहणी

या रिसॉर्ट प्रकरणी केंद्राकडून एक समिती नेमण्यात आली आहे. केंद्राकडून नेमलेली ही समिती मुरुड मधल्या साई रिसॉर्टवर आज दाखल झाली, यात पर्यावरण खात्याची पाच जणांची टीम ही मुरुड मधल्या रिसॉर्टवर रिसॉर्टवर दिसून आली. या टीम मध्ये चेन्नईमध्ये पर्यावरण संस्था आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटचे अधिकारीही होते. आतापर्यंत याप्रकरणी काय कारवाई झाली? तसेच पर्यावरणाच्या हानीची या टीमकडून चौकशी करण्यात आली आहे. अनिल परब यांच्या मुरुड मधल्या साई रिसॉर्टनं सीआरझेडचा उल्लंघन केल्याचा आरोप ही भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हीच टीम साई रिसॉर्ट प्रमाणे सी कोच रिसॉर्टची देखील चौकशी करत आहे, अशी माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.

तपास यंत्रणांच्या हाती काय लागणार?

काही दिवसांपूर्वीच अनिल परब यांची ईडी कडून चौकशी करण्यात आली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांचं बंड राज्यात गाजत होतं. त्याचवेळी दुसरीकडे परबांची ईडीकडून चौकशी सुरू होती. आपण ईडीला सर्व सहकार्य केलं आहे. तपासात पुढे लागेल ते सर्व सहकार्य करीन, मी कोणतेही बेकायदेशीर काम केलं नाही, असं परब वारंवार सांगत आहेत. तर आता पुढचा नंबर हा परबांचा आहे, असं भाजप नेते किरीट सोमय्या हे वारंवार सांगत आहेत. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांवरूनही राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. आता यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती काय लागतं? आणि याप्रकरणी काय कारवाई होते? हे पाहणं तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.