AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरीच! एकनाथ शिंदे गटाला मोठा झटका!

विधानसभेतील शिवसेना विधीमंडळ पक्षनेतेपदी अजय चौधरींची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरीच! एकनाथ शिंदे गटाला मोठा झटका!
Image Credit source:
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jun 24, 2022 | 3:40 PM
Share

मुंबईः शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला मोठा झटका देणारी बातमी आहे. शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी अजय चौधरींचीच नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंना ज्या गटनेतेपदावरून हटवण्यात आलं होतं, त्या पदावर शिवसेनेनं अजय चौधरी (Ajay Chaudhari) यांची नियुक्ती केली होती.  शिंदे गटानं या नियुक्तीला आव्हान दिलं होतं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे गटातील या वादात उद्धव ठाकरेंचा विजय झाला आहे. उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या कार्यलयाकडून जारी केलेल्या एका पत्राद्वारे अजय चौधरींच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बंडखोर गटाला हा मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे.

16 बंडखोर आमदारांवर टांगती तलवार?

शिवसेनेच्या गटनेतेपदी अर्थात विधीमंडळाच्या पक्ष नेतेपदी अजय चौधरी यांना मान्यता मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाला धोका निर्माण झाला आहे. शिंदे गटातील 16 आमदारांचं निलंबन करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. त्यानुसार आज सुनावणी होणार आहे. शिवसेनेचे सुनिल प्रभू यांनी काढलेल्या व्हीपनंतर बैठकीला उपस्थित न राहिलेल्या या आमदारांच्या निलंबनावर आता सुनावणी सुरु होईल. आता गटनेते पदी उद्धव ठाकरे गटातील अजय चौधरी यांची नियुक्ती झाल्यामुळे बंडखोर 16 आमदारांच्या सदस्यत्वावर टांगती तलवार आहे.

Letter

रडारवरील आमदारांचं पुढे काय?

शिवसेनेकडून अपात्र ठरवलेल्या आमदारांबाबत विधानसभा उपाध्यक्षांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर सदर आमदारांना शिवसेनेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर एका वेळी 4 आमदारांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष यासंबंधीचा निर्णय घेतली. मात्र ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळेची मर्यादा ठरलेली नाही. त्यामुळे ही सुनावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी विधीमंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोण आहेत अजय चौधरी?

अजय चौधरी हे दक्षिण मध्य मुंबईतील शिवडी मतदार संघातून विधानसभेवर निवडून आलेले आमदार आहेत. शिवसेनेतील वरिष्ठ आणि विश्वासू नेते मानले जातात. 2015 मध्ये शिवसेनेने त्यांच्याकडे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पद दिले होते. 2019 मध्ये त्यांना विधानसभेचं तिकिट देण्यात आलं होतं. त्यानंतर ते शिवडी मतदार संघातून निवडून आले. एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवण्यात आल्यानंतर शिवसेनेतील आमदारांची बैठक झाली आणि या बैठकीत अजय चौधरीच हे शिवसेनेचे गटनेते असतील यावर शिक्कामोर्तब झालं होतं. मात्र एकनाथ शिंदे गटानं यावर आक्षेप घेतला होता.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी