ओवैसी लैच बोलले, म्हणाले, तुम्ही खुशाल बिकिनी घाला, आम्ही हिजाब का काढावा?

या देशाला हिजाब घालणाराच पंतप्रधान मिळेल हे जेव्हा मी सांगतो तेव्हा काही लोकांचं डोकं दुखतं. काहींच्या पोटात दुखतं. मी असं का बोलू नये? हे माझं स्वप्न आहे. त्यात चुकीचं काय आहे?

ओवैसी लैच बोलले, म्हणाले, तुम्ही खुशाल बिकिनी घाला, आम्ही हिजाब का काढावा?
ओवैसी लैच बोलले, म्हणाले, तुम्ही खुशाल बिकिनी घाला, आम्ही हिजाब का काढावा?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 4:32 PM

नवी दिल्ली: हिजाब प्रकरणावर (Hijab Ban) सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अजून यायचा आहे. त्यापूर्वीच या मुदद्यावरून राजकारण तापलं आहे. एमआयएमचे (AIMIM) नेते असदुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi) यांनी याप्रकरणात आता उडी घेतली आहे. मुस्लिम स्त्रियांचं देशाच्या विकासात योगदान नाहीये का? मुस्लिम महिला आपलं तोंड झाकून ठेवत असतील तर याचा अर्थ त्या आपली बुद्धिमत्ता झाकून ठेवत आहेत का? मुसलमान आपल्या लहान मुलांना हिजाब परिधान करण्याची जबरदस्ती करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. खरंच आपण अशी जबरदस्ती करतोय का? असा सवाल ओवैसी यांनी केला. तसेच तुम्ही खुशाल बिकिनी घाला. आम्ही आमचा हिजाब का काढावा? असा सवालही त्यांनी केला.

‘हिजाब हे मुस्लिमांच्या मागासलेपणाचं लक्षण आहे का?’, या विषयावरील एका कार्यक्रमात असदुद्दीन ओवैसी बोलत होते. आमच्या भगिनी किती खतरनाक वाहने चालवतात हे पाहायचं असेल तर तुम्ही हैदराबादला या. त्यांच्या मागे तुमची वाहने कधीच लावू नका. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. मी माझ्या ड्रायव्हरला नेहमीच सावधपणे गाडी चालवण्यास सांगत असतो. त्यांच्या मोटारसायकल मागे हेल्मेट लावून बसा. तर कळेल त्यांना किती फोर्स केला जात आहे, असं ओवैसी म्हणाले.

आम्हाला मुली घाबरवत असल्याचं ते म्हणतात. मला सांगा आजच्या काळात कोण कुणाला घाबरवतं का? असा सवालही त्यांनी केला. हिंदू, शीख आणि ख्रिश्चन विद्यार्थ्यांना आपले धार्मिक पोषाख घालून वर्गात जायला परवानगी आहे. फक्त मुस्लिमांच्या पोशाखावर बंदी घालण्यात आली आहे. ते मुस्लिम विद्यार्थ्यांबाबत काय विचार करतात? मुस्लिम आमच्यापेक्षा खालच्या दर्जाचे आहेत, असंच त्यांना वाटतंय, असा आरोप त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

या देशाला हिजाब घालणाराच पंतप्रधान मिळेल हे जेव्हा मी सांगतो तेव्हा काही लोकांचं डोकं दुखतं. काहींच्या पोटात दुखतं. मी असं का बोलू नये? हे माझं स्वप्न आहे. त्यात चुकीचं काय आहे? तुम्हाला वाटतं का की त्यांनी हिजाब घालू नये. त्यांनी हिजाब परिधान करू नये तर मग काय परिधान करावं? बिकिनी? तुम्हालाही परिधान करण्याचा अधिकार आहे, असं सांगतानाच तुम्हाला काय वाटतं आमच्या मुलींनी हिजाब काढावा आणि आम्ही दाढ्या कापाव्यात?, असा सवाल त्यांनी केला.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.