AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Assembly Election 2023 | काँग्रेसने विधासभेतील पराभवाचे खापर कोणावर फोडले?

Assembly Election 2023 | राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव का झाला? याची कारणे शोधली जाणार आहे. परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही कारणे शोधली आहे. त्यांनी पराभवाचे खापर कोणत्या नेत्यांवर फोडले नाही...नवी दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले...

Assembly Election 2023 | काँग्रेसने विधासभेतील पराभवाचे खापर कोणावर फोडले?
congress protest in new delhi
| Updated on: Dec 03, 2023 | 1:10 PM
Share

नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीपैकी चार राज्यांत रविवारी मतमोजणी झाली. दुपारी १ वाजेपर्यंत निवडणूक निकाल जवळपास स्पष्ट झाले. काँग्रेसने या निवडणुकीत आपल्याकडे असणारी दोन राज्य गमवली. भाजपने मात्र एक राज्य कायम ठेवत आणखी दोन राज्यात सत्ता मिळवली. तेलंगणात मात्र काँग्रेसला यश मिळत आहे. परंतु राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव का झाला? त्यासाठी कोणाला ‘बलि का बरका’ बनवला गेला, हे आता समोर आले आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पराभवाचे खापर इलेक्ट्रीक व्होटर मशिन म्हणजे EVM वर फोडले आहे. कार्यकर्त्यांनी इव्हीएम विरोधात घोषणाबाजी करत प्रदर्शन केले.

काँग्रेसने पुन्हा फोडले EVM

काँग्रेसची राजस्थानमध्ये सत्ता होती. त्या ठिकाणी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्याकडे पक्षाची कामान होती. राहुल गांधी यांनी या ठिकाणी सभा घेतल्या होत्या. राजस्थानमधील कलानुसार काँग्रेस १९९ जागांपैकी केवळ ७० जागांवर आघाडीवर आहे. भाजपने ११४ जागांवर आघाडी घेतली आहे. परंतु या ठिकाणी काँग्रेसचा पराभवास ईव्हीएम जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्ते करत आहे. त्यामुळे नवी दिल्लीत काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.

छत्तासगडमध्ये भूपेश बघेल यांची सत्ता होती. परंतु या ठिकाणी त्यांना सत्ता टिकवता आली नाही. छत्तीसगडमध्ये ९० पैकी ५३ जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. काँग्रेस ३६ जागा मिळताना दिसत आहे. यामुळे या ठिकाणी एक्झिट पोलचे अंदाजही फोल ठरताना दिसत आहे. काँग्रेसच्या पराभवास जबादार कोण याची चर्चा आता सुरु झाली आहे. राहुल गांधी, कमलनाथ, अशोक गेहलोत, भूपेश बघेल की अन्य कोणी…तर कार्यकर्ते एव्हीएमवर खापर फोडत आहे. नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यलयाबाहेरचे वातावरण बदलले आहे. या ठिकाणी सकाळी विजयाच्या जल्लोषाची तयारी झाली होती. परंतु आता आंदोलन केले जात आहे. हे आंदोलन इव्हीएम मशिनविरोधात आहे. लोकशाही वाचवण्यासाठी इव्हीएमने मतदान बंद करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते करत आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.