Elections | औरंगाबाद महापालिका निवडणूकीच्या सुनावणीची तारीख आणखी पुढे, सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी?

एप्रिल 2019 मध्ये महापालिकेची मुदत संपली आहे. मात्र कोरोना संकटामुळे निवडणूक लांबणीवर पडली असून महापालिकेवर सध्या प्रशासक आहेत.

Elections | औरंगाबाद महापालिका निवडणूकीच्या सुनावणीची तारीख आणखी पुढे, सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी?
औरंगाबाद महापालिका
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 4:04 AM

औरंगाबादः राज्यातील विविध शहरांच्या महापालिका निवडणुकांची (Aurangabad Municipal Corporation) प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानिमित्ताने राजकीय वातावरणही खूप तापले आहे. अनेक ठिकाणी प्रभाग रचना जाहीर झाली आहे. सुनावणी आणि हरकत मागवण्याची प्रक्रियाही पार पडत आहे. त्यानुसार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक कामालाही लागले आहेत. मात्र औरंगाबाद महापालिकेसंदर्भातली एक याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित असल्यामुळे येथील निवडणूक प्रक्रियेला म्हणावा तेवढा वेग येत नाहीये. राजकीय पक्षांनी आपापल्या स्तरावर मोर्चेबांधणी सुरु केली असली तरीही तांत्रिक प्रक्रियेत ही निवडणूक अडकल्यामुळे इच्छुकांना (Aurangabad politics) सध्या शांत बसण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. येत्या 3 मार्च रोजी सदर प्रलंबित याचिकेवर सुनावणी होणार असा अंदाज होता. मात्र ही तारीख आता 30 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते समीर राजूरकर यांनी दिली आहे.

काय आहे याचिका?

औरंगाबाद महापालिकेने 2015 मध्ये घेतलेल्या निवडणुकीत प्रभाग रचना अत्यंत विस्कळीत आणि राजकीय पक्षांच्या सोयीनुसार केल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला होता. त्यामुळे यानंतर महापालिकेची जी निवडणूक होईल, त्यात अत्यंत पारदर्शक पद्धतीने प्रभाग रचना केली जावी, याकरिता समीर राजुरकर, सुरेश गवळी, उमाकांत दीक्षित आणि अनिल विधाते यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर 6 ऑक्टोबर 2020 रोजी जैसे आदेश मिळाले. एप्रिल 2019 मध्ये महापालिकेची मुदत संपली आहे. मात्र कोरोना संकटामुळे निवडणूक लांबणीवर पडली असून महापालिकेवर सध्या प्रशासक आहेत. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने बहुसदस्यीच प्रभाग रचनेचा अध्यादेश काढल्याने ही संपूर्ण याचिकाच निरस्त करण्याची विनंती निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र याचिका निरस्त म्हणून निकाली न काढता नव्याने राबवण्यात येणाऱ्या प्रभागरचना व आरक्षण प्रक्रियेत नियमांचे पालन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगास द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. या प्रकरणावर येत्या 3 मार्च रोजी सुनावणी होणार होती.

पुढील सुनावणीची तारीख काय?

सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख 3 मार्च ही कॉम्प्यूटरद्वारे जनरेट झाली होती. मात्र पुन्हा एकदा कॉम्प्यूटरद्वारे ही तारीख 30 मार्च रोजी झाल्याचे याचिकाकर्ते समीर राजूरकर यांनी सांगितले. ही तारीख लागल्यानंतर रजिस्ट्रारमार्फत बोर्डावर प्रकरण लावण्यात आले तरच सुनावणी होते. त्यामुळे पुढील महिनाभर तरी औरंगाबाद महापालिकेसंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी होणार नाही, अशी चिन्ह आहेत.

इतर बातम्या-

Indapur | इंदापूरमध्ये छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यासाठी ‘निमसाखर’ गाव एकवटले; घेतला ‘हा’ निर्णय

Kurla Balcony Collapsed : कुर्ल्यात शॉपिंग सेंटरचा छज्जा कोसळून पाच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.