बंटी पाटील की मुश्रीफ? अजित पवार की फडणवीस? राज ठाकरे की राणे? सहा आमदारांना अवधूत गुप्तेंचे 27 रॅपिड फायर प्रश्न

| Updated on: Jan 17, 2020 | 2:23 PM

कोणाचा जास्त राग येतो? राज ठाकरे की नारायण राणे असा प्रश्न अवधूत गुप्तेंनी आदित्य ठाकरेंना विचारला होता

बंटी पाटील की मुश्रीफ? अजित पवार की फडणवीस? राज ठाकरे की राणे? सहा आमदारांना अवधूत गुप्तेंचे 27 रॅपिड फायर प्रश्न
Follow us on

अहमदनगर : महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संगमनेरमध्ये संवाद साधण्यात आला. ‘अमृतवाहिनी महाविद्यालया’तील युवा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरुणाईशी’ कार्यक्रमाअंतर्गत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी यांना प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्तेंनी बोलतं केलं. (Avadhoot Gupte Rapid Fire)

सहा आमदारांना विचारलेले रॅपिड फायर प्रश्न

ऋतुराज पाटील

1. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा की मुंबईचं पापलेट? – तांबडा पांढरा
2. सिनेमात संधी मिळाल्यास कोणासोबत काम करायला आवडेल? – अनुष्का शर्मा की दीपिका पदुकोण – दीपिका पदुकोण
3. कॉलेज लाईफ की आमदारकी?- आमदारकी
4. मुरब्बी नेता कोण? – बंटी पाटील की हसन मुश्रीफ – बंटी पाटील

झिशान सिद्दीकी

1. शिवसेनेच्या उमेदवाराला हरवल्याचा आनंद जास्त आहे की काँग्रेसने शिवसेनेसोबत सरकार स्थापन केल्याचा? –
महाविकास आघाडीचा
2. काँग्रेसशिवाय जवळचा पक्ष कोणता? शिवसेना की राष्ट्रवादी – शिवसेना
3. क्रिकेट की फुटबॉल? – क्रिकेट
4. जवळचा मित्र कोण? ऋतुराज पाटील की आदित्य ठाकरे – ऋतुराज पाटील
5. शाहरुख की सलमान? – सलमान

आदिती तटकरे

1. राजकारणातील हिरो कोण? अजित पवार की सुनिल तटकरे – अजित पवार
2. वडापाव की पिझा? – वडापाव
3. सलमान की आमीर? – सलमान
4. मम्मीच्या पसंतीचा की स्वतःच्या – स्वतःच्या

आदित्य ठाकरे

1. कोण जास्त आवडतं? अजित पवार की देवेंद्र फडणवीस- अजित पवार
2. जवळचं कोण? आई की बाबा – आईबाबा
3. भाजपमधील जवळचा नेता कोण?- पंकजा मुंडे की एकनाथ खडसे – महाविकास आघाडीसाठी दोन्ही जवळचे
4. सर्वाधिक धक्का कधी बसला? अजित पवारांनी पहाटे शपथ घेतल्यावर की संजय राऊत लीलावतीत गेल्यावर – दोन्ही नाही
5. सर्वाधिक ऐकलेलं वाक्य? आमची चर्चा सुरु आहे, चर्चा सकारात्मक होत आहे की मुख्यमंत्री शिवसेनेचाच आणि
शपथविधी शीवतीर्थावर – दोन्ही
6. कोणाचा जास्त राग येतो? राज ठाकरे की नारायण राणे – उत्तर टाळलं

रोहित पवार

1. तात्या विंचू की कवट्या महाकाळ? – कवट्या महाकाळ
2. मुख्यमंत्री म्हणून भविष्यात कोणाला पाहायला आवडेल?- अजित पवार की सुप्रिया सुळे – पवारसाहेब ज्यांना ठरवतील ते
3. कोणाकडून अधिक अपेक्षा आहेत? सुजय विखे की सत्यजीत तांबे – दोघांकडून अनेक अपेक्षा आहेत.
4. जवळचं काय? कर्जत जामखेड की बारामती – लढायला शिकवलं ते कर्जत जामखेड

धीरज देशमुख

1. सर्वाधिक प्रेम कोणावर- रितेश देशमुख की अमित देशमुख – रितेश देशमुख
2. आवडता चित्रपट कोणता? लय भारी की तुझे मेरी कसम – लय भारी
3. मुख्यमंत्री म्हणून भविष्यात कोणाला पाहायला आवडेल?- आदित्य ठाकरे की रोहित पवार – दोन्ही
4. धीर कोणी धरावा? – उदयनराजे की संजय राऊत – संजय राऊत (अप्रत्यक्ष उत्तर)

Avadhoot Gupte Rapid Fire

संबंधित बातम्या :

अवधूत गुप्ते म्हणाले, आपकी बात ‘पटनी’ चाहीए, आदित्य म्हणाले, तुमची ‘दिशा’ चुकली!

सासुरवाडीऐवजी कर्जत-जामखेड का निवडलं? अवधूत गुप्तेंच्या गुगलीवर रोहित पवारांचं उत्तर