विरोधी पक्षाला विश्वासात न घेतल्याने महाराष्ट्रात कोरोनाचा हाहा:कार : बबनराव लोणीकर

| Updated on: Jun 12, 2020 | 6:36 PM

बबनराव लोणीकर यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला आज विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली (Babanrao Lonikar slams Maharashtra Government).

विरोधी पक्षाला विश्वासात न घेतल्याने महाराष्ट्रात कोरोनाचा हाहा:कार : बबनराव लोणीकर
Follow us on

जालना :राज्य सरकारने विरोधी पक्षाला विश्वास घेतलं नाही (Babanrao Lonikar slams Maharashtra Government). त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाने हाहा:कार माजला”, असा घणाघात भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केला. लोणीकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला आज विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली (Babanrao Lonikar slams Maharashtra Government).

“राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे संकंट थांबवायचं असेल तर सरकारमधील तीनही पक्षांनी एकत्र काम करणं आवश्यक आहे. या युद्धात सरकारने सर्वांना सोबत घेऊन काम करणं अपेक्षित आहे”, असं बबनराव लोणीकर म्हणाले.

“कोरोना लढाईत राज्य सरकारला विरोधी पक्षाचं 100 टक्के सहकार्य आहे. मात्र, राज्यातील मंत्र्यांमध्ये खुर्ची आणि श्रेष्ठतेवरुन वाद सुरु आहे. तीन पक्षांच्या या सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतलं जात नाही म्हणून काँग्रेसने वेगळी बैठक घेतली. काँग्रेससारखा पक्ष सरकारमध्ये सहभागी आहे, तरीही विश्वासात घेतलं जात नाही, अशी तक्रार करतो?”, असा सवाल बबनराव लोणीकर यांनी केला.

“कोरोना युद्धादरम्यान विरोधी पक्ष म्हणून राज्य सरकारला सहकार्य आणि समर्थन राहील. येत्या 21 जूनपासून विधानसभेचं अधिवेशन सुरु होणार होतं. सरकारने हे अधिवेश पुढे ढकलण्याचा प्रस्ताव ठेवला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावाचं समर्थन केलं”, असं लोणीकर यांनी सांगितलं.

“राज्यातील जनतेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 342 कोटी रुपये दिले. पण राज्य सरकारने फक्त 23 कोटी रुपये खर्च केले. मास्कसुद्धा हे सरकार केंद्राकडून मागतं. आता तरी सरकारने शहाणं व्हावं”, असा घणाघात बबनराव लोणीकर यांनी केला.

“एखाद्या देशावर परकीयांनी हल्ला केला आणि युद्ध सुरु झालं तर देशातील सर्व नागरिक एकत्र आले पाहिजेत. महाराष्ट्रात जवळपास 1 लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे एक प्रकारचं कोरोनाशी युद्धच आहे”. असंदेखील ते यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या :

बाळासाहेब थोरांताना विश्वासात घेऊनच काम सुरु, काँग्रेसकडे दुर्लक्ष नाही : राजेश टोपे

Congress Upset | निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याने काँग्रेस नाराज, स्वतंत्र बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

फडणवीसांकडून 10 हजारांच्या मदतीची मागणी, मात्र वादळग्रस्तांच्या खात्यात सोमवारपासून 20 हजार जमा होणार : वडेट्टीवार