AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जपून रहा रे रवी राणा, बच्चू भाऊ आला रे… आता बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांचं आव्हान?; ग्राऊंड लेव्हलला काय चाललंय?

अनेक कार्यकर्ते कुटुंबकबिल्यासह आले आहेत. या कार्यकर्त्यांच्या जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सर्वांना शिस्त पालन करण्याच्या वारंवार सूचनाही दिल्या जात आहेत.

जपून रहा रे रवी राणा, बच्चू भाऊ आला रे... आता बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांचं आव्हान?; ग्राऊंड लेव्हलला काय चाललंय?
जपून रहा रे रवी राणा, बच्चू भाऊ आला रेImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 01, 2022 | 2:33 PM
Share

अमरावती: शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू (bacchu kadu) आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा (ravi rana) यांच्यातील वाद संपुष्टात आल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर खुद्द रवी राणा यांनीच हा वाद संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. मात्र, असं असलं तरी ग्राऊंड लेव्हलवर परिस्थिती अजून वेगळीच आहे. बच्चू कडू यांचे कार्यकर्ते अजूनही रवी राणा यांच्यावर नाराज असलेलं दिसून येत आहे. बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून ही नाराजी प्रकर्षाने दिसून येत आहे.

बच्चू कडू यांनी रवी राणा वादावर उत्तर देण्यासाठी आज अमरावतीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्याला हजारो कार्यकर्ते लोटले आहेत. तब्बल दहा हजार कार्यकर्ते या मेळाव्याला येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

अनेक कार्यकर्ते कुटुंबकबिल्यासह आले आहेत. या कार्यकर्त्यांच्या जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सर्वांना शिस्त पालन करण्याच्या वारंवार सूचनाही दिल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर रवी राणा यांच्या विरोधात कोणत्याही घोषणा देऊ नका, असं आवाहन करण्यात येत आहे.

मात्र, बच्चू कडू यांचे कार्यकर्ते सूचना ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसून येत आहे. प्रहारच्या या मेळाव्यात कार्यकर्ते भजन आणि गाणी गाताना दिसत आहेत. त्यातून हे कार्यकर्ते राणा यांना थेट आव्हानच देताना दिसत आहेत.

या कार्यकर्त्यांनी आगे आगे जनता है! पिछे जमाना सारा है! मेरे बच्चू भाऊ का एक जलवा निराला है!, असं भजन गायलं. बरं एवढं गाऊन थांबतील ते बच्चू कडू यांचे कार्यकर्ते कसले? या कार्यकर्त्यांनी आणखी एक गाणं गायलं.

जपून रहा रे रवी राणा, बच्चू भाऊ आला रे, असं गाणं हे कार्यकर्ते म्हणत आहेत. हातात वाघ आणि बच्चू कडू यांचे फलक भजन आणि गाणी गायली जात आहे. त्यावरून कार्यकर्ते रवी राणा यांच्याविरोधात संतप्त असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, मेळाव्याच्या परिसरात बच्चू कडू यांचे मोठ मोठे बॅनर्स लावलण्यात आले आहेत. त्यावर झुकेगा नही, असं लिहिण्यात आलं आहे. बच्चू कडू यांच्या बॅनरवरील इशारा हा रवी राणा यांच्या दिशेनेच असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर रवी राणा यांच्या अमरावती येथील घराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Follow Us
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान, विरोधकांना केलं चर्चेच आवाहन
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास..
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास ही चूक पडणार महागात
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी बैठकीत सगळंच सागितलं...
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी सगळंच सागितलं अन् एकनाथ शिंदेंनी दिले कडक निर्देश, थेट मकोका...
3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत...
मराठा आरक्षणावर मोठी अपडेट! 3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत सर्वाधिक वितरण
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…