ममता बॅनर्जींना काँग्रेस नेत्यांचं जोरदार प्रत्युत्तर; अशोक चव्हाण आणि थोरातांचा ममतांसह विरोधकांना मोलाचा सल्ला

| Updated on: Dec 01, 2021 | 8:24 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत सविस्तर चर्चाही केली. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या या टीकेला आता काँग्रेस नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे.

ममता बॅनर्जींना काँग्रेस नेत्यांचं जोरदार प्रत्युत्तर; अशोक चव्हाण आणि थोरातांचा ममतांसह विरोधकांना मोलाचा सल्ला
बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले
Follow us on

मुंबई : काँग्रेसला वगळून भाजपविरोधात तिसरा सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्नात पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई दौऱ्यावर असलेल्या ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतली. तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत सविस्तर चर्चाही केली. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या या टीकेला आता काँग्रेस नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे.

राहुल गांधीवर अप्रत्यक्षपणे टीका करून भाजपलाच मदत – थोरात

काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, भाजप आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसच लढत आहे हे देशाला माहित आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी व वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन कोणत्याही पक्षाला भाजपविरोधात लढता येणार नाही. काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सात वर्षात काँग्रेस पक्षाने भाजप सरकारविरोधात निडरपणे लढा लढला आहे. राहुल गांधी आणि संपूर्ण कुटुंबियांवर या दरम्यान भाजप आणि इतर पक्षांकडून वैयक्तीक हल्ले केले गेले. त्यांच्या बदनामीच्या मोहिमा चालवल्या गेल्या, मात्र तरीही राहुलजी गांधी मागे हटले नाहीत. देशातील गोरगरिब सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून मोदी सरकारच्या विरोधात पहाडाप्रमाणे ठामपणे उभे राहून लढत राहिले. त्यामुळेच आज देशातील जनतेने त्यांची भूमिका स्वीकारलेली आहे. अशा वेळी राहुल गांधीवर अप्रत्यक्षपणे टीका करून भाजपला मदत होईल अशी भूमिका घेणारे पक्ष भाजपला पर्याय कसा ठरू शकतात?, असा सवाल थोरात यांनी केलाय.

भाजपच्या ‘फोडा आणि झोडा’चा प्रयोगाला बळ देऊ नका – चव्हाण

लोकशाही व संविधानाप्रती कटिबद्धता आणि विद्यमान केंद्र सरकार विरोधातील संघर्षाबाबत काँग्रेसला आणि काँग्रेस नेतृत्वाला कोणाच्याही प्रशस्तीपत्राची आवश्यकता नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत नेहमीच काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकतेने लढा दिला. भाजपच्या केंद्र सरकारचा लोकविरोधी भूसंपादन कायदा व तीन काळे कृषी कायदे रद्द करण्याबाबत आणि इतर अनेक प्रश्नांवर काँग्रेसची आक्रमक व सक्रिय भूमिका संपूर्ण देशाने पाहिली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सक्षम, खंबीर नेतृत्वाखाली हा लढा भविष्यात अधिक नेटाने लढला जाईल. मागील 7 वर्ष केंद्र सरकार विरोधकांवर ‘फोडा आणि झोडा’चा प्रयोग करते आहे. देशभरातील गैरभाजप पक्षांनी केंद्राच्या त्या प्रयोगाला बळ देणारे राजकारण करू नये, अशी अपेक्षा आहे. देशाच्या व्यापक हिताला ते पोषक नाही, असा सल्ला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिलाय.

काँग्रेस हाच पर्याय : नाना पटोले

भाजप हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत. देशातील जनता हे पहात आहे. वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

सत्ता, पैसा आणि स्वायत्त संस्थाचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने देशाच्या लोकशाही आणि संविधानाला संपवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. भाजपच्या या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत. राहुल गांधी हेच मोदी आणि भाजपाविरोधात ठामपणे उभे राहिले. भूसंपादन कायद्यातील बदल आणि तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राहुल मोदी सरकारविरोधात लढले, असंही पटोले म्हणाले.

इतर बातम्या :

‘ममता बॅनर्जींनी काँग्रेस विसर्जित केली का? काँग्रेसला हे मान्य आहे का?’ यूपीएच्या मुद्द्यावरुन आशिष शेलारांचा खोचक सवाल

महावितरणने अतिरेक केल्यास जशास तसं उत्तर देणार, उर्जामंत्री नितीन राऊतांना राजू शेट्टींचं उत्तर