AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Balasaheb Thorat Profile : बाळासाहेब थोरात यांची संपूर्ण माहिती

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Congress Balasaheb Thorat Profile) हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसचा महत्त्वाचा चेहरा आहेत.

Balasaheb Thorat Profile : बाळासाहेब थोरात यांची संपूर्ण माहिती
| Updated on: Nov 28, 2019 | 7:06 PM
Share

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हा उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचा चेहरा असणार आहे (Congress Balasaheb Thorat Profile). महाविकासआघाडीची मोट बांधण्यामध्ये बाळासाहेब थोरात यांची मोठी भूमिका राहिली आहे. दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींना राजी करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे ते विश्वासू मानले जातात.

बाळासाहेब थोरात यांची वैयक्तिक माहिती

नाव : बाळासाहेब उर्फ विजय भाऊसाहेब थोरात जिल्हा : अहमदनगर पक्ष : काँग्रेस वय : 66 वर्षे शिक्षण : कायद्याची पदवी

बाळासाहेब थोरात यांची कारकिर्द

  • 1985 संगमनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून बहुमतांनी विजयी.
  • 1988 संगमनेर येथे 1 लाख लीटर क्षमतेच्या शासकिय दुग्ध शाळेची स्थापना, संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघावर चेअरमन म्हणून बिनविरोध निवड, जुलै 1993 पर्यंत सलग चेअरमनपदी यशस्वीरित्या धुरा सांभाळली
  • 1989 भंडारदरा धरणाच्या पाण्याच्या फेरवाटपसंबंधी सन 1984 पासून सुरु केलेल्या चळवळीस यश मिळाले.
  • 1990 संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आय पक्षाचे उमेदवार म्हणून प्रचंड बहुमताने विजय
  • 1991 रेशीम उद्योगास सुरुवात, तालुक्यातील तुतीची लागवड करण्यास प्रारंभ
  • 1992 शेती, दुग्ध व्यवसाय, पाणी, पशुसंवर्धन इत्यादी विषयानुषंगाने स्वत्झलँड, डेन्मार्क या देशाच अभ्यास दौरा
  • 1993 संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड, संगमनेर तालुका सहकारी पतसंस्थांच्या फेडरेशनच्या चेअरमनपदावर बिनविरोध निवड
  • 1994 संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी फेरनिवड, तसेच चेअरमनपदी बिनविरोध निवड, नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को ऑप लि नवी दिल्ली या संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड
  • 1995 संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आय पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून बहुमताने विजयी, द ऑल इंडिया डिस्टीलरी असोसिएशन, नवी दिल्ली या संस्थेच्या संचालकपदी निवड
  • 1997 नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को ऑप नवी दिल्ली या संस्थेच्या संचालकपदी निवड
  • 1999 संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी मताधिक्याने निवड, सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आय कमिटीच्या सरचिटणीसपदी निवड, संगमेनर विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवड, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे व लाभक्षेत्रात विकास राज्यमंत्री म्हणून समावेश
  • 2000 उस्मानाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून नियुक्ती, नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को ऑ लि नवी दिल्ली या संस्थेच्या संचालकपदी निवड,
  • 2003 महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात पाटबंधारे व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री फेरनिवड
  • 2004 संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि मताधिक्याने पुन्हा विजय, 9-11-2004 कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ
  • 2005 4-02-2005 संगमनेर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड
  • 2006 उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवज तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या संपर्कमंत्रीपदी नियुक्ती, महाराष्टर राज्याचे मतदारसंघ पुनर्गठण समितीच्या सदस्यापदी निवड, महाराष्ट्र राज्य जलसंधारण सल्लागार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी निवड
  • 2008 देशभक्त किसनवीर यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा कृतज्ञा पुरस्कार 21-08-2008 रोजी करंजखोप, जिल्हा सातारा येथे समारंभपूर्वक प्रदान, मा ना अशोकराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात कृषी, जलसंधारण व राजशिष्टाचार खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून 8-12-2008 रोजी शपथ व समावेश
  • 2009 संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आय पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून बहुमताने विजयी 2010 मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात महसूल व खार जमीन खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून निवड
  • 2019 काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड, 24-10-2019 रोजी आठव्यांदा विधानसभेत विक्रमी मताधिक्याने निवड, काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड
  • 2010 मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात महसूल व खार जमीन खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून निवड
  • 2019 काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड, 24-10-2019 रोजी आठव्यांदा विधानसभेत विक्रमी मताधिक्याने निवड, काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.