बारामतीतही भाजपच्या बॅनरवरुन आदित्य ठाकरे गायब

बारामती : भाजप-शिवसेना महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचाराच्या बॅनरवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो लावण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मुंबईनंतर आता बारामतीतही बॅनरवरुन भाजप आणि शिवसेनेत वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत. बॅनरवर आदित्य ठाकरे यांचा फोटो न छापल्याने भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना युवासेनेच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यानंतर पूनम महाजन …

बारामतीतही भाजपच्या बॅनरवरुन आदित्य ठाकरे गायब

बारामती : भाजप-शिवसेना महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचाराच्या बॅनरवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो लावण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मुंबईनंतर आता बारामतीतही बॅनरवरुन भाजप आणि शिवसेनेत वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत. बॅनरवर आदित्य ठाकरे यांचा फोटो न छापल्याने भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना युवासेनेच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यानंतर पूनम महाजन यांनी थेट ‘मातोश्री’कडे धाव घ्यावी लागली होती. त्यातच आता बारामतीतही असाच प्रकार घडल्याने भाजप-शिवसेनेमधील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातील युतीच्या भाजप उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचाराच्या बॅनरवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो अतिशय लहान आकाराचा ठेवण्यात आला होता. तर आदित्य ठाकरे यांचा फोटो या बॅनरवरुन वगळण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी जाहीर सभेत आक्षेप नोंदवला. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनीही यापुढे अशी चूक न करण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. मात्र, एकाच दिवशी मुंबई आणि बारामतीत तसेच अन्य काही ठिकाणी शिवसेनेला दाबण्याचा हा प्रयत्न तर नाही, असा प्रश्न शिवसैनिकांना पडतो आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनरवरील फोटोवरुन कसलीही नाराजी नसल्याचं आणि सर्वजण एकत्रित काम करत असल्याचं सांगण्यात आलं.

बारामतीत काही दिवसांपूर्वी महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेनेच्या नेत्या निलम गोर्हे, राज्यमंत्री विजय शिवतारे इत्यादी नेते उपस्थित होते. या मेळाव्याच्या व्यासपीठावर लावलेल्या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा फोटो एका कोपऱ्यात अतिशय लहान आकारात लावण्यात आला होता. तर आदित्य ठाकरे यांचा फोटो यातून वगळण्यात आला होता. यावर काही कार्यकर्त्यांनी जाहीर आक्षेप नोंदवला. त्यावर भाजप नेत्यांनी अशा चुका न करण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.

बारामतीतील मेळाव्यात शिवसेनेने घेतलेल्या आक्षेपानंतर बॅनरमध्ये दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेत याबद्दल कसलीही नाराजी नसून सर्वजण एकदिलाने काम करत असल्याचं जिल्हाप्रमुख अॅड. राजेंद्र काळे यांनी सांगितलं. तर भाजपने मोठ्या कसरतींनंतर शिवसेनेशी युती केली. त्यामुळे शिवसेनेला भाजपला परवडणारं नसल्याचं पत्रकार अमोल तोरणे यांनी सांगितलं.

मुंबईतील उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार पूनम महाजन यांनी महायुतीच्या नेत्यांचं बॅनर लावलं होत. त्यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो छापला नव्हता. त्यामुळे युवासेनेने नाराजी व्यक्त केली. आदित्य ठाकरे यांचा फोटो न छापल्याने भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना युवासेनेच्या रोषाचा सामना करावा लागला. ऐन निवडणुकीच्या काळात युवासेनेचा राग ओढवून घेणं महागात पडू शकतं, म्हणून बिथरलेल्या पूनम महाजन यांनी थेट ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

संबंधित बातम्या : 

युवासेनेच्या नाराजीनंतर पूनम महाजन बिथरल्या, थेट ‘मातोश्री’च्या दारावर

सुनेत्रा अजित पवार यांचे सहा नातेवाईक लोकसभेच्या रिंगणात

बारामतीच्या लेकीलाच भाजपची उमेदवारी, कांचन कुल आणि पवार कुटुंबाचं नातं काय?

बारामतीत जाऊन पहिलं भाषण करत कांचन कुल यांचा पार्थ पवारांना टोला

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *