तर फक्त ‘या’ कारणासाठी राजकारण सोडणार, बच्चू कडू असं का म्हणाले?

रवी राणा यांनी राजकारण सोडण्याचीही भाषा केलीय. का? वाचा...

तर फक्त या कारणासाठी राजकारण सोडणार, बच्चू कडू असं का म्हणाले?
| Updated on: Nov 01, 2022 | 3:55 PM

अमरावती : रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. विधिमंडळ अधिवेशन काळात विरोधकांनी लावून धरलेला खोक्यांचा विषय पुन्हा चर्चेत आला. सत्ताधारी पक्षातील नेत्यानेच खोके घेण्याचा आरोप केल्याने विरोधक टीका करू लागले अन् राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. अशात बच्चू कडू (Bcchu Kadu) यांनी आज अमरावतीत कार्यकर्ता मेळावा घेतला. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी राजकारण सोडण्याचीही भाषा केलीय.

ॉसर्वसामान्यांचे प्रश्न सुटायला पाहिजेत. जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. असं दिसलं तर मी सत्तेतून बाहेर पडणार. राजकारण सोडणार आणि लोकांसाठी कार्यकर्ता म्हणून काम करणार, असं बच्चू कडू म्हणालेत.

राज्यमंत्री असताना 1182 मिटिंग घेतल्या. मिळालेल्या मंत्रिपदाचा फायदा सर्वसामान्य माणसाला कसा पोहोचेल हे पाहिलं. हक्काचं सरकार पाहिजे. आम्ही म्हणालो तर सरकार उठलं आणि बसलं पाहिजे. तेव्हा सर्वसामान्यांचे प्रश्न सुटतील, असं बच्चू कडू म्हणालेत.

बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन छेडलं होतं. तेव्हा जर आतासारखं मीडिया कव्हरेज मिळालं असतं. तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले असते. पण तसं झालं नाही, अशी खंत बच्चू कडू यांनी बोलून दाखवली. पण टीव्हीवर रोज दिसून उपयोग नाही. तर लोकांचे प्रश्न सुटणं जास्त महत्वाचं आहे,असं बच्चू कडू म्हणाले.

रवी राणा यांनी माघार घेतली. दिलगिरी व्यक्त केली. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांनी पहिल्यांदा असं म्हटलं. त्यामुळे त्यांना माफ केलं.पण येत्या काळात जर कुणी पुन्हा असं बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना प्रहारचा वार काय असतो हे दाखवून देऊ, असं बच्चू कडू म्हणालेत.