तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही, सत्ता गेली चुलीत; बच्चू कडू आक्रमक

आपल्याकडे गरीबांची मुलगी पळून गेली तर पळून गेली म्हणतात. आणि श्रीमंताची पोरगी पळाली तर तिनं लव्ह मॅरेज केलं म्हटलं जातं, असं बच्चू कडू यांनी सांगताच एकच खसखस पिकली.

तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही, सत्ता गेली चुलीत; बच्चू कडू आक्रमक
तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही, सत्ता गेली चुलीत; बच्चू कडू आक्रमकImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 3:02 PM

अमरावती: रवी राणा (ravi rana) यांच्याशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू (bacchu kadu) यांनी आज अमरावतीत जोरदार मेळावा घेतला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात शेरोशायरीने करत रवी राणा यांना नाव न घेता इशारा दिला. प्रहार काही आंडूपांडूचा पक्ष नाही. प्रहारमध्ये (prahar) दहा वार करण्याची ताकद आहे. तो बाजी आहे. तानाजी आहे. वार करण्याची क्षमत आमच्यात आहे. मैदानात असेल मैदानात, तलवारीत आले तर तलवारीत आणि सेवेत आले तर सवेत आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही आणि गेलं तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही. विनाकारण तोंड मारू नका. सत्ता गेली चुलीत. आम्हाला काही पर्वा नाही, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला.

जली को आग खते है और बुझी को राख कहते है और जिस बारूद जो निकलता है उसे प्रहार कहते है, अशी आपल्या भाषणाची सुरुवात बच्चू कडू यांनी केली. हा काही सत्तेचा पाठिंबा किंवा शक्तीप्रदर्शनाचा विषय नाही. आमचा पक्ष काही मोठा नाही. त्यामुळे आमच्या मेळाव्याला नियोजन नाही. आम्ही सैनिकांसारखं जगतो. फार विचार करत नाही. गर्दीमध्ये दर्दी आहेत. उगाच काय बच्चू कडू चार वेळा निवडून येतोय? असा सवाल बच्चू कडू यांनी केला.

हे सुद्धा वाचा

आम्ही दिवस पाहिला नाही. रात्र पहिली नाही. आम्ही लोकांसाठी धावत होतो. काम करत होतो. गेल्या 25 वर्षात राज्यातील एकही कोपरा सोडला नाही. इतका महाराष्ट्र फिरलो. तेव्हा कुठे दिव्यांगांना सत्तेत स्थान मिळालं, असं त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी राणांबरोबरचा विषय संपल्याचंही स्पष्ट केलं. आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून आम्हाला बदनाम केलं जात आहे. आम्ही गुवाहाटीला का गेलो? माझ्याकडे मंत्रिपद होतं. मंत्रिपद सोडून कोण जातं का? पण जिथे तत्त्व येतं तिथे काही निर्णय घ्यावे लागतात, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ही काँग्रेसला जळतं घर म्हटलं होतं. पण जेव्हा वंचितांना न्याय द्यायची वेळ आली तेव्हा ते काँग्रेससोबत सत्तेत गेले. गोरगरीबांसाठी काही निर्णय घ्यावे लागतात, असं त्यांनी सांगितलं.

आपल्याकडे गरीबांची मुलगी पळून गेली तर पळून गेली म्हणतात. आणि श्रीमंताची पोरगी पळाली तर तिनं लव्ह मॅरेज केलं म्हटलं जातं, असं बच्चू कडू यांनी सांगताच एकच खसखस पिकली.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.