Bhaskar Jadhav | कोकणातल्या रस्त्यांसाठी सगळेच प्रयत्नशील, पण गडकरींच्या मनात यायला पाहिजे, भास्कर जाधवांचा थेट आरोप

| Updated on: Aug 25, 2022 | 5:16 PM

कोकणातले बडे प्रस्थ नितेश राणे यांनीदेखील या रस्त्यांवरून माध्यमांना प्रतिक्रिया दिली. भास्कर जाधवांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, भास्कर जाधवांना आठवण करून द्यावी लागेल, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नसून एकनाथ शिंदे हे आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आहेत.

Bhaskar Jadhav | कोकणातल्या रस्त्यांसाठी सगळेच प्रयत्नशील, पण गडकरींच्या मनात यायला पाहिजे, भास्कर जाधवांचा थेट आरोप
भास्कर जाधव, शिवसेना आमदार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः आगामी गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा रस्त्याच्या बिकट अवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. अनेक वर्षांपासून रस्त्याची दयनीय स्थिती आहे. यासाठी अनेक जण प्रयत्न करतायत. लोकप्रतिनिधी, माध्यमप्रतिनिधी झटत आहेत, मात्र जोपर्यंत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मनात येत नाही, तोपर्यंत हा रस्ता सुधारणार नाही, असा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केलाय. विधानसभेत (Maharashtra Assembly) आज मुंबई गोवा मार्गावरील खड्ड्यांमुळे कोकणवासियांना गणेशोत्सवासाठी घरी जाणे किती आव्हानात्मक स्थिती आहे, या समस्येवर लवकरात लवकर उपाय शोधला जावा, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तसेच बांधकाम मंत्र्यांनी तत्काळ रस्त्याची पाहणी करावी, अशी लक्षवेधी भास्कर जाधव यांनी मांडली.

भास्कर जाधव काय म्हणाले?

कोकणतील खड्डेमय रस्त्यांसाठी कोण जबाबदार आहे, यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले, ‘ रस्त्यांची अवस्था झालीय आहे. आम्ही प्रयत्न करतोयत. सगळेच प्रयत्न करतायत. प्रयत्न 2011 पासून सुरु आहेत. रस्ता नीट होईपर्यंत जनतेला दिलासा मिळणार नाही. तूर्त मी गणरायाला प्रार्थना करतो की, लोकांना गणेश उत्सावात आपापल्या घरी सुखरुप घेऊन ये, तुझी सेवा करून घे आणि पुन्हा मुंबईत जाण्यासाठी शक्ती दे. या रस्त्यांसाठी आम्ही सगळेच जबाबदार आहेत. जनता, लोकप्रतनिधी, मीडिया.. पण गडकरी साहेबांच्या मनात येत नाही, तोपर्यंत रस्ता सुधारणार नाही.

नितेश राणे काय म्हणाले…

कोकणातले बडे प्रस्थ नितेश राणे यांनीदेखील या रस्त्यांवरून माध्यमांना प्रतिक्रिया दिली. भास्कर जाधवांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, भास्कर जाधवांना आठवण करून द्यावी लागेल, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नसून एकनाथ शिंदे हे आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आहेत. त्यांना जी काही भीती वाटत होती, ती उद्धव ठाकरे यांच्यामुळे होती. आता ते मुख्यमंत्री नाहीत. उद्धव ठाकरेंच्या काळात काँट्रॅक्टर्सचे पैसेच दिले गेले नाहीत. आता एकनाथ शिंदे सरकारच्या काळात असे होणार नाही, असं आश्वासन मी देतो. उद्या आम्ही सर्वजण रस्त्यांच्या पाहणीसाठी जाणार आहोत. किंबहुना दोन दिवसांपूर्वीच कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक रवींद्र चव्हाण यांनी बोलावली होती. त्यात सर्व एजन्सीजकडून रस्त्याचे काम चांगले करून घ्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. त्यामुळे  गणेशोत्सवापूर्वी रस्ते सुधारून दाखवू, असं आश्वासनही नितेश राणे यांनी दिलंय. मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांना यंदा अगदी वेगळा, नवा अनुभव देण्याचा प्रयत्न करू, असेही नितेश राणे म्हणाले.