AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोडाफोडीची धमकी भीम आर्मीकडून अखेर मागे

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा सोलापुरातून पराभव झाल्यास भाजपचं एकही कार्यालय ठेवणार नाही, अशी धमकी भीम आर्मीने दिली होती. ही धमकी मागे घेण्यात आली आहे. आम्ही भीम आर्मीच्या भूमिकेशी सहमत नसून कार्यकर्त्यांनी याला बळी पडू नये, जो निकाल येईल तो स्वीकारावा लागेल, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यानंतर भीम […]

फोडाफोडीची धमकी भीम आर्मीकडून अखेर मागे
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: May 23, 2019 | 8:05 AM
Share

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा सोलापुरातून पराभव झाल्यास भाजपचं एकही कार्यालय ठेवणार नाही, अशी धमकी भीम आर्मीने दिली होती. ही धमकी मागे घेण्यात आली आहे. आम्ही भीम आर्मीच्या भूमिकेशी सहमत नसून कार्यकर्त्यांनी याला बळी पडू नये, जो निकाल येईल तो स्वीकारावा लागेल, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यानंतर भीम आर्मीने ही धमकी मागे घेतली आहे.

भीम आर्मीची धमकी

प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर या दोन मतदारसंघातून लढत आहेत. सोलापुरातून जर त्यांचा पराभव झाला तर भाजपचे सर्व कार्यालयं तोडून टाकू, अशी धमकी भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख अशोक कांबळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. सोलापुरात प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांचं आव्हान आहे. काही एक्झिट पोलमध्ये सोलापुरात भाजप, तर काहींनी काँग्रेसचा विजय होत असल्याचा अंदाज व्यक्त केलाय.

प्रकाश आंबेडकर यांचा भारिप आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने 48 जागांवर उमेदवार दिले होते. ईव्हीएममध्ये घोळ झाला नाही तर आमचे सर्वच्या सर्व 48 उमेदवार निवडून येतील, असा आश्चर्यकारक दावाही प्रकाश आंबेडकरांनी केला होता. प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भाजपची बी टीम असा आरोप केला जातो. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. आम्हाला बी टीम म्हणून हिणवलं गेलं, पण आम्ही आमची मतं मिळवणार आणि जरी काँग्रेसनं आमचा खिमा केला, तरी आम्ही धर्मनिरपेक्ष ताकदीबरोबर राहणार, असं ते म्हणाले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 58.45 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. इथं भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत झाली.

Follow Us
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा