AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस बंडखोरांमुळे बाजी पलटली, भिवंडीत चार नगरसेवक असलेल्या पक्षाचा महापौर

अवघे चार नगरसेवक असणाऱ्या 'कोणार्क विकास आघाडी'च्या नगरसेविका प्रतिभा पाटील भिवंडीच्या महापौर झाल्या आहेत

काँग्रेस बंडखोरांमुळे बाजी पलटली, भिवंडीत चार नगरसेवक असलेल्या पक्षाचा महापौर
| Updated on: Dec 05, 2019 | 3:23 PM
Share

भिवंडी : भिवंडी महापालिकेत (Bhiwandi Municipal Corporation Mayor Election) एकहाती सत्ता असणाऱ्या काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. अवघे चार नगरसेवक असणाऱ्या ‘कोणार्क विकास आघाडी’च्या नगरसेविका प्रतिभा पाटील यांनी महापौरपदाची खुर्ची पटकावली. भाजप आणि काँग्रेस बंडखोरांच्या जोरावर ‘कोणार्क विकास आघाडी’ला हा विजय मिळवता आला. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे बंडखोर इमरानवल्ली यांची निवड झाली.

काँग्रेस नगरसेवकांच्या बंडखोरीमुळे भिवंडीत महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आणि हादरा बसला तो महापालिकेत एकहाती सत्ता असणाऱ्या काँग्रेस पक्षाला. 47 नगरसेवक असणाऱ्या काँग्रेसची भिवंडी महापालिकेत सत्ता होती. अगदी मोदी लाटेतही भिवंडीत काँग्रेसने निर्भेळ यश मिळवलं होतं. मात्र जे लाटेत टिकवलं, ते बंडखोरीच्या पुरात काँग्रेसला राखता आलं नाही.

भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीत कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा पाटिल यांना 49 मतं मिळाली तर काँग्रेसच्या रिषिका राका यांना 41 मतं पडली. काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटल्याने पक्षाला मोठा झटका बसला. प्रतिभा पाटील यांना भाजपच्या 20, काँग्रेसच्या 18 बंडखोर, स्वपक्ष अर्थात कोणार्क विकास आघाडीच्या 4, समाजवादी पक्षाच्या 2, रिपाइं (एकतावादी) गटाच्या 4 आणि एका अपक्ष नगरसेवकाने मतदान केलं.

आम्हाला परत घ्या, भाजपच्या डझनभर आमदारांचं ‘मविआ’पुढे लोटांगण?

महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून रिषिका राका, कोणार्क विकास आघाडीकडून प्रतिभा पाटील, तर शिवसेनेकडून वंदना मनोज काटेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काँग्रेसने रिषिका राका यांना मतदान करण्यासाठी नगरसेवकांना व्हीपही जारी केला होता. मात्र व्हीप मोडत काँग्रेसच्या नगरसेवकांनी बंडखोरी केली आणि कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील महापौरपदी (Bhiwandi Municipal Corporation Mayor Election) विराजमान झाल्या.

दरम्यान, भिवंडीच्या उपमहापौरपदी काँग्रेसचे बंडखोर इमरानवल्ली यांची निवड झाली आहे. इमरानवल्ली यांना 49 मतं मिळाली तर शिवसेनेचे बालाराम मधुकर चौधरी यांना 41 मतं मिळाली. शिवसेनेचे फक्त 12 नगरसेवक असतानाही राज्यात झालेल्या महाविकास आघाडीमुळे त्यांना 41 चा आकडा गाठता आला होता. परंतु काँग्रेच्या बंडखोरांमुळे शिवसेनेचं भिवंडीतील उपमहापौरपदाचं स्वप्नही भंगलं.

भिवंडी महापालिका पक्षीय बलाबल (Bhiwandi Municipal Corporation Mayor Election)

काँग्रेस – 47 शिवसेना – 12 भाजप – 20 कोणार्क विकास आघाडी – 04 समाजवादी पक्ष – 02 रिपाइं (एकतावादी गट) – 04 अपक्ष – 01

एकूण – 90

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.