भाजपचा बिहारमध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न होता!, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन निवडणूक आयोगावर टीका

| Updated on: Nov 11, 2020 | 2:47 PM

बिहारमधील NDAचा विजय आपण मानत नसल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्याचबरोबर बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान फायदा करुन घेण्यासाठी भाजपचा बिहारमध्ये दंगली घडवण्याचा डाव होता. पण भाजपचा हा डाव आम्ही पूर्णत्वास जाऊ दिला नाही, असा गंभीर आरोपही आंबेडकर यांनी केला आहेत.

भाजपचा बिहारमध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न होता!, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन निवडणूक आयोगावर टीका
Follow us on

औरंगाबाद: बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपचा दंगली घडवण्याचा डाव होता, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ओरंगाबादेतील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे. बिहारमध्ये NDAचा विजय झाला असला तरी तो आम्ही मानत नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्याचबरोबर ईव्हीएमच्या मुद्द्यावरुनही आंबेडकर यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. (Prakash Ambedkar on Bihar election and EVM)

बिहार विधानसभा निवडणुकीत NDAला काटावर बहुमत मिळालं आहे. 125 जागा जिंकत बिहारच्या मैदानात नितीश कुमार यांचा JDU, भाजप आणि मित्रपक्षांच्या युतीने बाजी मारली आहे. असं असलं तरी आपण हा NDAचा विजय मानत नसल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्याचबरोबर बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान फायदा करुन घेण्यासाठी भाजपचा बिहारमध्ये दंगली घडवण्याचा डाव होता. पण भाजपचा हा डाव आम्ही पूर्णत्वास जाऊ दिला नाही, असा गंभीर आरोपही आंबेडकर यांनी केला आहेत.

ईव्हीएम मशीनवर पुन्हा प्रश्नचिन्ह!

बिहारमध्ये पप्पू यादव यांच्यासाठी आपण सभा घेतल्या. सभेला १० हजारापर्यंत श्रोते उपस्थित असायचे. कोरोना काळात पप्पू यादव यांनी खूप मदत केल्याचं स्थानिकांनी सांगितलं. मग अशावेळी ती व्यक्ती 4 नंबरला कशी काय फेकली जाऊ शकते? असा प्रश्न उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएम मशीन आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

पेपर छापणे आणि ते केंद्रापर्यंत पोहोचवणे एवढंच काम निवडणूक आयोग करत असल्याची टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली. ईव्हीएम मशीन हे रिटर्निंग ऑफिसरच्या हातात असतात. त्या रिटर्निंग ऑफिसरकडून स्पष्टीकरण मागावं, अशी विनंती आपण न्यायालयाकडे करत असल्याचंही आंबेडकर म्हणाले. रिटर्निंग ऑफिसर जोपर्यंत स्पष्टीकरण देत नाही तोवर आरोप आणि संशय काम राहील असंही आंबेडकर म्हणाले.

मंदिरे, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर टीका

मंदिरं उघडण्यासाठी आम्ही पंढरपुरात आंदोलन केलं. त्यावेळी हजारो भाविक, वारकरी उपस्थित होते. भाजपला मात्र गोंधळ कुठे घालायचा हेच कळलं नाही. लोकांनीच त्यांचा बडवून पाठवलं, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर शरसंधान साधलं.

मराठा आरक्षणाच्या जागा बाजूला काढून अन्य सर्व प्रक्रिया सुरु झाल्या पाहिजेत अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. श्रीमंत आणि गरीब मराठा समाज एकप्रकारची चढाओढ आहे. गरीब मराठा समाज आपल्यासोबत यावा असं श्रीमंत मराठा समाजाला वाटत नाही, असंही आंबेडकर म्हणाले.

संबंधित बातम्या:

sanjay raut! आमची टांग वर झाल्यास भूमंडळ हालते; संजय राऊत यांचा इशारा

तीन पक्षांचं सरकार पण काँग्रेसला बळकट करायचेय, बाळासाहेब थोरातांना बळ द्या: पृथ्वीराज चव्हाण

Prakash Ambedkar on Bihar election and EVM