भाजप येणार, मुंबई घडवणार, मुंबई जिंकण्यासाठी भाजपने रणशिंग फुंकलं

| Updated on: Nov 18, 2020 | 5:17 PM

भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचं 'भाजप येणार, मुंबई घडवणार' हे घोषवाक्य जाहीर केलं आहे.

भाजप येणार, मुंबई घडवणार, मुंबई जिंकण्यासाठी भाजपने रणशिंग फुंकलं
Follow us on

मुंबई : भारतीय जनता पक्षाने (BJP) मुंबई महानगरापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी (BMC Election) मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर आज (18 नोव्हेंबर) भाजपच्या दादरमधील वसंतस्मृती येथील कार्यालयात मुंबई भाजप कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक सुरु आहे. यावेळी भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचं ‘भाजप येणार, मुंबई घडवणार’ हे घोषवाक्य (BJP’s Slogan BMC election) जाहीर केलं आहे. तसेच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मुंबई सेवा सेतूचं उद्घाटन केलं जाणार आहे. (BJP Announces Slogan for BMC election)

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मध्यंतरीच्या काळात राज्यातील इतर निवडणुकांमध्ये शिवसेनेची घसरण झाली असली तरी आजवर सेनेचा मुंबई महानगरपालिकेचा किल्ला अभेद्य राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नाकावर टिच्चून महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायचीच, असा चंग यंदा भाजपने बांधला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत आक्रमक रणनीतीमुळे भाजपला चांगले यश मिळाले होते. शिवसेना आणि भाजपच्या संख्याबळात फारसे अंतर नव्हते. मात्र, त्यावेळी भाजपने आम्ही पहारेकऱ्याच्या भूमिकेत राहू असे सांगत महापौरपदाच्या शर्यतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता शिवसेनेशी युती तुटल्यामुळे भाजप यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत अत्यंत आक्रमक प्रचार करेल, असा अंदाज आहे.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये (bihar assembly election) भाजपच्या विजयामुळे महाराष्ट्रातही भाजप नेत्यांना बळ मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे. भाजपने मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation elections) तयारीला सुरूवात केल्याची माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी मागील आठवड्यात दिली होती.

महापालिका निवडणुकीत आम्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकारने केलेलं काम घेऊन जनतेपर्यंत जाणार आहोत. मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार असून देवेंद्र फडणवीस हे पालिका निवडणुकांवर लक्ष ठेवून असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. शेलार म्हणाले की, शिवसेनेचा मतदार हा शिवसेनेला महापालिका निवडणुकीत सोडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही असेच सोबत रहा, येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमचा पराभव करणार हे बिहारच्या आकड्यांवरून स्पष्ट होतं.

संबंधित बातम्या

मुंबई महापालिका निवडणुकीत ‘बिहार पॅटर्न’?, शेलारांचे संकेत; शिवसेनेसाठी धोक्याची घंटा

आशिष शेलारांनी महापालिका निवडणुकीचं शंख फुंकलं, BMC वर झेंडा फडकवण्याची तयारी सुरु

मुंबईचा गड जिंकण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी; फडणवीस- चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक

(BJP Announces Slogan for BMC election)