बनावट दारु विकणारा हेलिकॉप्टरने फिरतोय, संजयकाकांचा पडळकरांवर निशाणा

सांगली : बनावट दारु विकणारा हेलिकॉप्टर घेऊन फिरतोय, अशी जहरी टीका सांगली विद्यमान खासदार आणि भाजपचे सांगलीचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर केली आहे. सांगलीतील जत येथे संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही हजर होते. संजयकाका पाटील काय …

बनावट दारु विकणारा हेलिकॉप्टरने फिरतोय, संजयकाकांचा पडळकरांवर निशाणा

सांगली : बनावट दारु विकणारा हेलिकॉप्टर घेऊन फिरतोय, अशी जहरी टीका सांगली विद्यमान खासदार आणि भाजपचे सांगलीचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर केली आहे. सांगलीतील जत येथे संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही हजर होते.

संजयकाका पाटील काय म्हणाले?

“सांगलीत दर्जाहीन निवडणूक आणि दर्जाहीन प्रचार सुरू आहे. समाजाचं नाव घेऊन प्रचार सुरु आहे.”, अशी खंत व्यक्त करत संजयकाका पुढे म्हणाले, “नागजच्या रस्त्यावर बनावट दारु विकणारा माणूस आज हेलिकॉप्टर घेऊन फिरत आहे. आज लोकांना इमोशनल ब्लकमेलिंग केले जात आहे.”

“निवडणुकीनंतर बघू. मी संजय पाटीलच आहे. पूर्वीचा संजय पाटील अजून जिवंत आहे. आज माझ्यावर चुकीची टीका केली जात आहे. पण मी सर्वांचा हिशोब चुकता करणार आहे.”, असा भर सभेत संजयकाका पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना इशारा दिला.

मुख्यमंत्र्यांची काँग्रेससह स्वाभिमानीवर टीकास्त्र

“सत्तेशी तडजोड करत नाहीत, त्यांना स्वाभिमानी म्हणतात. मात्र हे कसले स्वाभिमानी. कालपर्यंत ज्यांना शिव्या घालत होते, त्यांच्याबरोबरच तुम्ही जाऊन बसला. आम्ही खरे स्वाभिमानी आहोत. सत्तेत प्रस्थापित असणाऱ्यांना आम्ही विस्थापित केले.”, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि स्वाभिमानी संघटनेवर केली.

वसंतदादांच्या वारसदारांवर मुख्यमंत्र्यांचा निशाणा

“वसंतदादांच्या शताब्दीवेळी काँग्रेस किंव्हा वसंततदादांच्या वारसांनी एकही कार्यक्रम घेतला नाही. उलट सरकारने कार्यक्रम घेतले. वारसदार हे फक्त नाटक करतात. उमेदवारीसाठी प्रयत्न करतात. मिळत नाही म्हटल्यावर बंडखोरीची भाषा करतात, परत पक्ष सोडतात आणि दुसऱ्या पक्षाची उमेदवादी घेतात. जे काय सुरु आहे, यांची जनतेला कल्पना आहे.”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विशाल पाटील आणि प्रतिक पाटील यांच्यावर निशाणा साधला.

म्हैसाळ जलसिंचन योजनेचा विस्तार केला जाणार आहेच, याला तर तत्त्वत: मान्यता अगोदरच दिली आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *