अकोल्यात गोपीकिशन बाजोरिया विरुद्ध भाजपचे वसंत खंडेवाल, विधानपरिषदेच्या निवडणुकीत ठाकरे, गडकरींची प्रतिष्ठा पणाला

| Updated on: Nov 20, 2021 | 10:05 PM

विधानपरिषदेच्या अकोला, वाशिम - बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये भाजपच्यावतीने अकोल्यातील सराफा व्यावसायिक वसंत खंडेलवाल यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली. शुक्रवारी संध्याकाळी ही घोषणा करण्यात आली. या उमेदवारीमुळे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासमोर अकोल्यातूनच आव्हान उभे ठाकले आहे.

अकोल्यात गोपीकिशन बाजोरिया विरुद्ध भाजपचे वसंत खंडेवाल, विधानपरिषदेच्या निवडणुकीत ठाकरे, गडकरींची प्रतिष्ठा पणाला
GOPIKISHAN BAJORIYA AND VASANT KHANDELWAL
Follow us on

अकोला : विधानपरिषदेच्या अकोला, वाशिम – बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी भाजपने अकोल्यातील सराफा व्यावसायिक वसंत खंडेलवाल यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली. शुक्रवारी संध्याकाळी ही घोषणा करण्यात आली. या उमेदवारीमुळे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासमोर अकोल्यातूनच आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या चार टर्मपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात भाजप – शिवसेना युतीच्या माध्यमातून सदैव सोबत राहिलेली आहे. पण यावेळी समीकरणे वेगळी असणार आहेत.

एकूण 821 मतदार मतदान करणार 

भाजप-शिवसेना युती दुभंगल्यामुळे हे दोन्ही पक्ष आमने-सामने उभे ठाकले आहेत. विजयाचा आकडा जुळविण्यात कोण यशस्वी होतो हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे. या निवडणुकीसाठी अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील मनपा, न.प., जि.प. व नगर पंचायत सदस्य मतदान करतील. जिल्हा प्रशासनाकडून मतदारांची प्राथमिक यादी जाहीर करण्यात आली असून एकूण 821 मतदार आहेत यात 389 पुरुष आणि 432 महिला मतदारांचा समावेश आहे. सर्वाधिक 368 मतदार हे बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. अकोल्यात 285 तर वाशिम जिल्ह्यात एकूण 168 मतदार आहेत.

महाविकास आघाडीकडून एकत्रितरित्या उमेदवाराची घोषणा

तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन निवडणूक आचारसंहितेचा कुठे भंग होता का ? याकडे बारीक लक्ष ठेऊन आहे.ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडी एकत्रितरित्या उमेदवाराची घोषणा केली असून शिवसेनेकडून बाजोरिया यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. गेल्या चार टर्मचा विचार करता या मतदारसंघात अकोल्यातून आव्हान दिले गेले नाही. गेल्या तीन्ही निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला अनुक्रमे लता इंगोले, राधेश्याम चांडक व रवींद्र सपकाळ यांनी आव्हान दिले होते. हे तिन्ही उमेदवार अकोल्याच्या बाहेरील होते. पण यावेळी पाहिल्यांदाच अकोल्यातील प्रतिस्पर्धी मिळणार आहे.

जागा खेचून आणण्यासाठी भाजपचा प्रयत्न

अकोल्यात शिवसेनेला सोबत घेत भाजपने लोकसभेसह सर्व विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेतले होते. महापालिकेतही दमदार संख्याबळ मिळवून झेंडा फडकविला होता. आता युती नसली तरी विधानसभेत शिवसेनेच्या एकमात्र विजयात भाजपचाही मोठा वाटा होताच. पदवीधर मतदारसंघही भाजपच्याच ताब्यात आहे. त्यामुळे विधानपरिषदेची जागा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे खंडेलवाल यांची उमेदवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कोट्यातील मानली जाते. त्यामुळे एकप्रकारे गडकरींची प्रतिष्ठा यानिमित्ताने पणाला लागली आहे.

वंचित बहुजन आघाडी उमेदवार देणार

दुसरीकडे या निवडणुकीत सर्वांच लक्ष वंचितकडे असणार आहे. कारण या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची मते निर्णायक ठरणार आहेत. शेवटच्या दिवसापर्यंत वंचित आघाडीची मते कुणाला जाणार हे निश्चित नसते. पूर्वेतिहास पाहता वंचित आघाडीला मिळाणारी मते शिवसेनेचे उमेदवार गोपिकिशन बाजोरिया यांच्या बाजूने राहिलेली आहेत. पण यावेळी वंचित आघाडीचे मतदान भाजपला जाते की महाविकास आघाडीला किंवा त्यांचा स्वतंत्र उमेदवार ठरतो, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

इतर बातम्या :

VIDEO: ‘बिरोबाच्या नावानं चांगभलं…’ आझाद मैदान दुमदुमले, कोणत्याही परिस्थितीत परबांच्या बंगल्यावर धडक देणारच; एसटी कामगार इरेला पेटले

भाजपच्या रक्तातच मुस्लीम बांधवांविषयी विष, जनतेनं त्यांना जाब विचारावा: दत्तात्रय भरणे

बबनराव लोणीकरांची जीभ घसरली, टोपेंना म्हणाले हरामखोर, जालन्यात गुन्हा दाखल!