AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पेगासिस’ची चिंता सोडा, ‘पेंग्विनची’ चिंता करा; चित्रा वाघ यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

केंद्र सरकारवर भडकलेल्या संजय राऊतांना चित्रा वाघ यांनी पेगासस प्रकरणाची चिंता करण्यापेक्षा पेग्विंनची चिंता करा म्हणत प्रत्युत्तर दिलंय.

'पेगासिस'ची चिंता सोडा, ‘पेंग्विनची’ चिंता करा; चित्रा वाघ यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
भाजप नेत्या चित्रा वाघ, शिवसेना खासदार संजय राऊत
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jul 29, 2021 | 1:31 PM
Share

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून पेगॅसस प्रकरणावर भाष्य करणारा रोखठोक अग्रलेख लिहित केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. नागरिकांच्या स्वातंत्र्याचं हनन केलं जात असल्याचं म्हणत हे कुणी केलंय, याचं उत्तर देशाला मिळालं पाहिजे, असं राऊत म्हणाले. एकंदरित केंद्र सरकारवर भडकलेल्या राऊतांना चित्रा वाघ यांनी या प्रकरणाची चिंता करण्यापेक्षा पेग्विंनची चिंता करा म्हणत प्रत्युत्तर दिलंय. (BJP Chitra Wagh Slam Shivsena Sanjay Raut over Pegasus)

संजयजी पेगासिसची चिंता सोडा, ‘पेंग्विनची’ चिंता करा

आज ज्या युवराजांच्या ‘प्रिय’ ठेकेदारामुळं ‘डोरी’चा जीव गेला त्याच हायवे कंस्ट्रक्शन कंपनीला कोविड रूग्णासाठी ‘प्राणवायु’ पुरवठ्याचा ठेका दिला आहे. मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या याच कंपनीच्या दिरंगाई व गचाळ कारभारासाठी फक्त ०.५ टक्के दंड आकारला गेला, का आणि कोणासाठी?, असा सवाल करत संजयजी पेगासिसची चिंता सोडा, ‘पेंग्वीनची’ चिंता करा, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

संजय राऊत यांनी पेगासस प्रकरणावर अग्रलेखात काय लिहिलं होतं…?

पेगॅसस’ प्रकरण (Pegasus) जर सरकारला गंभीर वाटत नाही तर मग हे रहस्यमय वाटतं. ‘पेगॅसस’ प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण आहे हे देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे. ‘पेगॅसस’ची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं, अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) केंद्र सरकारवर (Modi GOVT) करण्यात आलीय.

‘पेगॅसस’ प्रकरण जर सरकारला गंभीर वाटत नाही हे रहस्यमय

‘पेगॅसस’ हेरगिरी प्रकरणात संसदेतला गोंधळ थांबायला तयार नाही. विरोधकांना हेरगिरी प्रकरणाची सखोल चौकशी हवी आहे. संयुक्त संसदीय समिती स्थापन करून चौकशी करा, अशी विरोधकांची मागणी आहे व सरकारने त्याकडे पूर्ण दुर्लक्षच केले आहे. निदान न्यायालयीन चौकशी तरी करा हे त्यांचे मागणेही मान्य होत नाही. दोन केंद्रीय मंत्री, काही खासदार, सर्वोच्च न्यायालय, लष्कराचे अधिकारी व असंख्य पत्रकार यांचे फोन चोरून ऐकले जातात हे प्रकरण सरकारला गंभीर वाटत नाही. हे जरा रहस्यमय वाटत असल्याचं राऊत म्हणाले.

खाजगी आयुष्यावर आक्रमण अपराध तर आहेच पण निर्लज्जपणाही…

विरोधकांना या प्रश्नी जितके बोंबलायचे ते बोंबलू द्या, अशी ‘बाणेदार’ भूमिका सरकारने घेतलेली दिसते. विरोधकांवर, पत्रकारांवर, नागरिकांवर पाळत ठेवणे, त्यांच्या खासगी आयुष्यावर अशाप्रकारे अतिक्रमण करणे हा अपराध तर आहेच, पण निर्लज्जपणाही आहेच. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित हा सर्व मामला असला तरी कुणी गांभीर्याने घ्यायला तयार नाही, पण आमच्या सरकारची भूमिका याबाबत वेगळी आहे.

(BJP Chitra Wagh Slam Shivsena Sanjay Raut over Pegasus)

हे ही वाचा :

पेगॅसस’ची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं, सामनातून केंद्रावर टीका

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ