मोदींसाठी 5 रुपये द्या, फंड जमवण्यासाठी भाजपची मोहीम

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी निधी गोळा करण्यासाठी भाजपने नवा फंडा आजमावला आहे. भाजपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावेच निधी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. हा निधी धनदांडग्यांकडेच नव्हे तर देशभरातील जनतेकडून गोळा करण्यात येणार आहे. भाजपने देशातील जनतेला तसं आवाहन केलं आहे. “छोटी गुंतवणूक करुन उज्ज्वल भारत बनवण्याची संधी तुमच्याकडे आहे”, असे मेसेज भाजपकडून देशभरातील […]

मोदींसाठी 5 रुपये द्या, फंड जमवण्यासाठी भाजपची मोहीम
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी निधी गोळा करण्यासाठी भाजपने नवा फंडा आजमावला आहे. भाजपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावेच निधी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. हा निधी धनदांडग्यांकडेच नव्हे तर देशभरातील जनतेकडून गोळा करण्यात येणार आहे. भाजपने देशातील जनतेला तसं आवाहन केलं आहे. “छोटी गुंतवणूक करुन उज्ज्वल भारत बनवण्याची संधी तुमच्याकडे आहे”, असे मेसेज भाजपकडून देशभरातील जनतेला पाठवण्यात येत आहेत. 5 रुपयांपासून पुढे कितीही रुपयांची मदत करता येणार आहे. त्यासाठी स्क्रॅच कुपनसारखी पद्धत अवलंबली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी योगदान द्या असाही संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेबसाईट narendramodi.in याद्वारे हा फंड जमा केला जात आहे. निधी देण्यासाठी तुम्हाला मेसेज पाठवला जातो. त्यामध्ये पंतप्रधानांच्या वेबसाईटची लिंक दिली जाते. या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करावं लागतं. मग डिटेल्स भरुन पैसे पाठवल्यानंतर तुम्हाला पैसे जमा झाल्याची पावती मेल केली जाते. राजकीय पक्षाला दिलेला निधी हा टॅक्स फ्री आहे.

निवडणुकांच्या तोंडावर निधी जमवण्यासाठी भाजपने ही शक्कल लढवली आहे. पंतप्रधान मोदींच्या नावेच पाच रुपयांपासून कितीही रुपयांपर्यंत मोदी मागितली जात आहे. पंतप्रधानांच्या नावेच, ते ही मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पैसे द्या, अशी मागणी भाजपकडून केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.