AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका वर्षात भाजपचा पक्षनिधी काँग्रेसपेक्षा 16 पटीने जास्त

दिल्ली : एका वर्षात भाजपला 400 कोटींपेक्षा जास्त  पक्षनिधी  मिळाला आहे. भाजपने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या काँट्रीब्यूशन रिपोर्टनुसार 2017-18 या एका वर्षात भाजपला 400 कोटी रूपयांहून अधिक पक्षनिधी मिळाला आहे. तर काँग्रेसला केवळ 26 कोटी रूपये पक्षनिधी मिळाला. भाजपचा पक्षनिधी हा काँग्रेसपेक्षा 16 पट्टींनी जास्त आहे. ईकॉनॉमिक टाईम्सच्या राजकीय पक्षांच्या योगदान अहवालांच्या आढाव्याद्वारे हे उघड झाले. दोन्ही राजकीय पक्षांच्या या वार्षीक ऑडिट अकाउंट्समध्ये […]

एका वर्षात भाजपचा पक्षनिधी काँग्रेसपेक्षा 16 पटीने जास्त
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM
Share

दिल्ली : एका वर्षात भाजपला 400 कोटींपेक्षा जास्त  पक्षनिधी  मिळाला आहे. भाजपने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या काँट्रीब्यूशन रिपोर्टनुसार 2017-18 या एका वर्षात भाजपला 400 कोटी रूपयांहून अधिक पक्षनिधी मिळाला आहे. तर काँग्रेसला केवळ 26 कोटी रूपये पक्षनिधी मिळाला. भाजपचा पक्षनिधी हा काँग्रेसपेक्षा 16 पट्टींनी जास्त आहे. ईकॉनॉमिक टाईम्सच्या राजकीय पक्षांच्या योगदान अहवालांच्या आढाव्याद्वारे हे उघड झाले. दोन्ही राजकीय पक्षांच्या या वार्षीक ऑडिट अकाउंट्समध्ये आणखी वाढ होऊ शकते. पूर्ण ऑडिटेड रिपोर्ट येईपर्यंत भाजपचा पक्षनिधी 1,000 कोटी रूपयांपर्यंत पोहोचू शकतो.

भाजप आणि काँग्रेसने आतापर्यंत 2017-18चं वार्षिक ऑडिट इन्कम टॅक्स रिटर्न आणि बँलेंसशीट अद्याप फाईल केलेली नाही.

दोन्ही राजकीय पक्षांनी अद्याप निवडणूक निधी जाहीर केलेला नाही. काँग्रेस आणि भाजपच्या वार्षीक ऑडिटेड अकाउंट्समध्ये याची माहिती दिली जाऊ शकते. याद्वारे भाजपला आणखी पक्षनिधी मिळू शकतो. भाजपला प्रूडेंट ईलेक्ट्रोरल ट्रस्टकडून 144 कोटींहून अधिक निधी मिळाला आहे. तर काँग्रेसला एक कोटी देणाऱ्या आदित्य बिर्ला जनरल ईलेक्ट्रोरल ट्रस्टने भाजपला 12 कोटींहून अधिकचा निधी दिला. मुरुगप्पा ग्रुपच्या ट्रांयफ ईलेक्टोरल ट्रस्टने भापज आणि काँग्रेसला प्रत्येकी एक कोटी रूपये दिले.

या शिवाय कॅडिला हेल्थकेयर 13 कोटीहून अधिक निधी भाजपला दिला.  माइक्रो लॅब्स प्राइव्हेट लिमिटेड आणि यूएसवी प्राइवेट लिमिटेडने भापज आणि काँग्रेसला प्रत्येकी नऊ कोटी रूपये दिले. सिप्लाने भापजला नऊ कोटी रूपये तर एलेंबिक फार्मास्युटिकल्स आणि महावीर मेडिकेटने सहा कोटी रूपये दिले. लोढाने 6.5 कोटी, जे कुमार ईन्फ्रास्ट्रक्चर प्रॉजेक्ट्सने पाच कोटी, तर रेअर इंटरप्राइजेसने नऊ कोटी रूपये भाजपला फंड स्वरूपात दिले.

2014मध्ये जेव्हा भाजप सत्तेवर आली, तेव्हापासून पक्षाच्या योगदान निधीत 53 टक्कयांची वाढ झाली आहे.  2013-14 साली पक्षांचा फंड हा  673.81 कोटी रूपये होता, जो 2016-2017 साली 1,034.27 कोटी पर्यंत वाढला होता. याच दरम्यान काँग्रेसचा निधी 598.06 कोटींहून घसरून 225.36 कोटींवर येऊन ठेपला. राजकीय विश्लेषकांच्या मते भाजप आणि इतर पक्षांच्या पक्षनिधीमध्ये खूप मोठी तफावत आहे.

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट