एकनाथ खडसे भाजपशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत? गिरीश महाजनांचे 2 मोठे दावे, वाचा…

भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी खडसेंबाबत दोन मोठे दावे केले आहेत. वाचा काय म्हणालेत...

एकनाथ खडसे भाजपशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत? गिरीश महाजनांचे 2 मोठे दावे, वाचा...
| Updated on: Oct 03, 2022 | 9:40 AM

मुंबई : आधी मुख्यमंत्रीपद दुरावलं. मग पक्षात कुचंबणा झाली. सहनशीलतेचा अंत झाला. एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) भाजपला रामराम केला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बाबतीतील सीडी दाखवण्याची भाषा केली. आपल्यावर झालेला अन्याय बोलून दाखवला. पण हेच खडसे आता पुन्हा एकदा स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मुख्य म्हणजे भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खडसेंबाबत दोन मोठे दावे केले आहेत.

महाजनांचा पहिला दावा

गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या मोठा दावा केलाय. ‘मिटवण्याच्या’ मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलंय. “मी आणि देवेंद्रजी बसलो होतो. तिथे खडसे आले आणि त्यांनी म्हटलं की आपण तिघं बसू. जे काही आहे ते सगळं मिटवून टाकू… त्यांच्या मनात नेमकं काय आहे? हे स्पष्टपणे कळू शकलं नाही. कारण आम्ही बसलो तिथे खूप गर्दी होती. तिथं त्यांना विचारता आलं नाही की नेमकं काय मिटवायचंय ते?”, असं म्हणत महाजनांनी खडसेंबाबत मोठा दावा केलाय.

महाजनांचा दुसरा दावा

खडसे आणि शाह भेटीबाबतही महाजन बोलले आहेत. “एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले होते. ते अमित शाह यांच्या कार्यालयाबाहेर दीड तास बसून होते. पण त्यांची भेट होऊ शकली नाही. शाह यांच्या कार्यालयातून मला फोन आला. त्यानंतर रक्षाताईंना मी फोन केला आणि विचारलं की काय झालं. त्यांनी सांगितलं की आम्ही बराच वेळ वाट पाहिली पण भेट होऊ शकली नाही”, असं महाजन म्हणाले आहेत.

महाजनांच्या या दाव्यानंतर खडसेंच्या घरवापसीबाबत चर्चा सुरु झाली आहे.