VIDEO | दिल्लीत कोकणाची आठवण येते का, नीलम राणे म्हणतात आम्ही ‘तिथून’ मासे मागवतो

| Updated on: Aug 19, 2021 | 2:02 PM

हा भावनिक क्षण आहे, कारण जन्म तिथे झाला, बालपण तिथे गेलं. त्या लोकांनी आम्हाला सुरुवात करुन दिली. त्या लोकांना पण अभिमान आहे राणेसाहेबांचा, अशा भावना नीलम राणेंनी व्यक्त केल्या.

VIDEO | दिल्लीत कोकणाची आठवण येते का, नीलम राणे म्हणतात आम्ही तिथून मासे मागवतो
Narayan Rane, Neelam Rane
Follow us on

मुंबई : केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) मुंबईत जन आशीर्वाद यात्रेत (Jan Ashirvad Yatra) सहभागी झाले. यावेळी त्यांच्या पत्नी नीलम राणेही सोबत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी जी जबाबदारी दिली आहे, ती सगळी जबाबदारी राणे साहेब पार पाडतील, अशा भावना नीलम राणेंनी व्यक्त केल्या.

नीलम राणे काय म्हणाल्या?

नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केलं, त्यावेळी नीलम राणेंशी संवाद साधण्यात आला. कारकीर्दीच्या सुरुवातीवरुन नीलम राणेंना प्रश्न विचारण्यात आला. “हा भावनिक क्षण तर आहेच, कारण जन्म तिथे झाला, बालपण तिथे गेलं. त्या लोकांनी आम्हाला सुरुवात करुन दिली. त्या लोकांना पण अभिमान आहे राणेसाहेबांचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी विश्वास टाकला आहे, जे जबाबदारी देतील, ती पार पाडण्याचं काम राणे साहेब करतील. मग ती मुंबई महापालिका असो किंवा केंद्रीय मंत्रिपद” असा विश्वास नीलम राणेंनी व्यक्त केला.

दिल्लीची लाईफस्टाईल थोडी वेगळी आहे. तिथली परिस्थिती मानवण्यासाठी काही वेळ द्यावा लागेल. मात्र कामातच बराचसा वेळ निघून जातो. वातावरण गरम-थंड थोडा फरक आहे, इतकंच. कोकणातील खाद्यसंस्कृतीची आठवण येते. आम्ही साऊथ इंडियन हॉटेलमधून मासे मागवतो. त्यांची गाडी येते मुंबईवरुन, अशी माहितीही नीलम राणेंनी दिली.

पाहा व्हिडीओ :

नारायण राणेंकडून बाळासाहेबांना अभिवादन

मुंबई विमानतळावरुन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करुन ही यात्रा शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाली. यावेळी नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं. नारायण राणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार की नाही याबाबत उत्सुकता होती. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंना स्मृतीस्थळावर जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला होता. मात्र राणेंनी आज नितेश राणे, प्रवीण दरेकर यांच्यासह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन केलं.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

हे जनतेचं प्रेम आहे. मला केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. पंतप्रधान मोदींसाहेबांमुळे हे पद मिळालं. अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांचे आभार. मंत्रिपद मिळाल्याच्या दीड महिन्यांनी मी महाराष्ट्रात आलो आहे. भाजपकडून आज जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला नतमस्तक झालो. माझ्या खात्याकडून जास्त रोजगार कसे तयार होतील, नोकऱ्या उपलब्ध करणं, दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, असं राणे म्हणाले.

संबंधित बातम्या :

32 वर्षांचा पापाचा घडा फोडणार, बाळासाहेबही म्हणाले असते, नारायण अशीच प्रगती कर : नारायण राणे

‘मातोश्री’च्या अंगणात काट्याची टक्कर, अटीतटीच्या लढतीत हरवलं, आता स्वत: तृप्ती सावंतांकडून नारायण राणेंचं स्वागत