AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मातोश्री’च्या अंगणात काट्याची टक्कर, अटीतटीच्या लढतीत हरवलं, आता स्वत: तृप्ती सावंतांकडून नारायण राणेंचं स्वागत!

Trupti Sawant | बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांना शिवसैनिकांचे हे वागणे अजिबात आवडले नसते, असे तृप्ती सावंत यांनी म्हटले. बाळासाहेब हेच आमचं दैवत आहे. आपला जुना शिवसैनिक मोठा होतोय, याचं स्वागत व्हायला हवं.

'मातोश्री'च्या अंगणात काट्याची टक्कर, अटीतटीच्या लढतीत हरवलं, आता स्वत: तृप्ती सावंतांकडून नारायण राणेंचं स्वागत!
नारायण राणे
| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 12:19 PM
Share

मुंबई: 2015 साली वांद्रे विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत नारायण राणे यांना अस्मान दाखवणाऱ्या तृप्ती सावंत याच गुरुवारी जन आशीर्वाद यात्रेसाठी मुंबईत आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान असलेल्या भागात नारायण राणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी व्यासपीठ उभारण्यात आले होते. त्यावेळी भाजपच्या स्थानिक नेत्या तृप्ती सावंत यांनी गळ्यात शाल घालून नारायण राणे यांचे स्वागत केले. नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे सध्या मुंबईतील वातावरण तापले आहे. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

मात्र, बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांना शिवसैनिकांचे हे वागणे अजिबात आवडले नसते, असे तृप्ती सावंत यांनी म्हटले. बाळासाहेब हेच आमचं दैवत आहे. आपला जुना शिवसैनिक मोठा होतोय, याचं स्वागत व्हायला हवं. आमचं आणि बाळासाहेबांचं नातं अतूट आहे, ते कधीच संपणार नाही. आम्ही शिवसेनेपासून दुरावलो असलो तरी बाळासाहेबांपासून कधीही दुरावणार नाही, असे तृप्ती सावंत यांनी सांगितले.

कोण आहेत तृप्ती सावंत?

महाराष्ट्रात 2014 ची विधानसभा निवडणूक जेव्हढी गाजली होती, त्यापेक्षा जास्त 2015 मधील वांद्रे पूर्वची पोटनिवडणूक गाजली होती. शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार बाळा सावंत यांचं निधन झालं होतं. त्यामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. त्यावेळी शिवसेनेने बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली होती.

2015 च्या निवडणुकीत तृप्ती सावंत यांच्याविरोधात काँग्रेसकडून नारायण राणे रिंगणात उतरले. थेट मातोश्रीला चॅलेंज देण्यासाठी नारायण राणे यांनी शड्डू ठोकला होता. आधी एकतर्फी वाटणारी आणि सहानुभूतीच्या लाटेवर असणारी ही निवडणूक, चांगलीच चुरशीची झाली. मातोश्रीच्या अंगणात नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंना चॅलेंज दिलं होतं. त्यामुळे शिवसैनिकांसाठी ही निवडणूक स्वाभिमानाची होती.

या निवडणुकीत तृप्ती सावंत यांनी जवळपास 20 हजारांच्या फरकाने नारायण राणेंचा पराभव केला होता. त्यावेळी शिवसैनिकांनी जल्लोष करताना हद्द पार केली होती. हातात कोंबड्या घेऊन राणेंविरोधात घोषणा दिल्या जात होत्या.

राणेंची जन आशीर्वाद यात्रा

मोदी सरकारमधील मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirvad Yatra) सुरु आहे. देशासह महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री तथा नवनिर्वाचित मंत्री जात आहेत. नव्याने मंत्री झालेले भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) आज मुंबईमध्ये जनतेचा आशीर्वाद मागणार आहे. केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आजपासून मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करणार आहेत.

जन आशीर्वाद यात्रेला मुंबई पोलिसांची नोटीस

भाजपच्या मुंबईमधल्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी जमाव बंदीचे आदेश काढलेले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रा पार पडते आहे. मुंबईतल्या विविध भागांत जाऊन ते लोकांशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी मुंबई पोलिसांनी यात्रेला नोटीस पाठवली आहे.

संबंधित बातम्या  

शिवाजी पार्कवरील एण्ट्रीपूर्वीच कारवाईला सुरुवात, नारायण राणेंचे बॅनर हटवले!

नारायण राणे मुंबईत ‘जन आशीर्वाद’ मागणार, शिवाजी पार्कातही जाणार, शिवसेनेवर हल्लाबोल करणार?

(Union Minister Narayan Rane Jan Ashirvad Yatra Mumbai)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.