शिवाजी पार्कवरील एण्ट्रीपूर्वीच कारवाईला सुरुवात, नारायण राणेंचे बॅनर हटवले!

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबईतून सुरुवात होत आहे. मात्र या यात्रेवर पावसाचं सावट आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस बरसत आहे.

शिवाजी पार्कवरील एण्ट्रीपूर्वीच कारवाईला सुरुवात, नारायण राणेंचे बॅनर हटवले!
Narayan Rane banners
Follow us
| Updated on: Aug 19, 2021 | 10:07 AM

मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जन आशीर्वाद यात्रेला (BJP Jan Ashirwad Yatra) मुंबईतून सुरुवात होत आहे. मात्र या यात्रेवर पावसाचं सावट आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस बरसत आहे. त्यातच मुंबई मनपाने माहिम , शिवाजी पार्क भागात नारायण राणे यांचे शुभेच्छा बॅनर हटवले. मुंबई मनपा कर्मचाऱ्यांनी अनधिकृत बॅनरवर कारवाई करत, या भागातील बॅनर हटवले.

नारायण राणे यांचं सकाळी 10 वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर शिवसेनेच्या गड असलेल्या शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला राणे वंदन घालतील. तसंच तिथल्या परिसरात वृक्षारोपण देखील करणार आहेत. तिथपासून जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात होणार आहे.

नितेश आणि निलेश राणेंकडून आढावा

दरम्यान नारायण राणे यांच्या आगमनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नितेश आणि निलेश राणे हे मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यांच्यासोबत भाजप नेते प्रमोद जठार आणि कालीदास कोळंबकर हे देखील उपस्थित आहेत.

बाळासाहेब राष्ट्राचे नेते

बाळासाहेब हे कुण्या पक्षाचे नेते नसून सर्व राष्ट्राचे नेते आहेत. ठाकरे कुटुंबाने राणेंना स्मारकावर यायला विरोध केला नाही, शिवसेनेच्या इतर नेत्यांनी देखील मोठे मन करावे. 2024 मध्ये कोण किती पाण्यात आहे हे दिसेल, असं आव्हान भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिलं.

राणेंची जन आशीर्वाद यात्रा 

मोदी सरकारमधील मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirvad Yatra) सुरु आहे. देशासह महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री तथा नवनिर्वाचित मंत्री जात आहेत. नव्याने मंत्री झालेले भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) आज मुंबईमध्ये जनतेचा आशीर्वाद मागणार आहे. केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आजपासून मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करणार आहेत.

नारायण राणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार का?

नारायण राणेंचं मुंबईत आगामन झाल्यानंतर विमानतळावरुन ते थेट शिवाजी पार्कात जाणार आहे. तिथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ते वंदन करतील. तिथेच शेजारी असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी राणे जाणार का?, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

संबंधित बातम्या  

नारायण राणे मुंबईत ‘जन आशीर्वाद’ मागणार, शिवाजी पार्कातही जाणार, शिवसेनेवर हल्लाबोल करणार?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.