AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narayan Rane Live : केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन

नारायण राणेंचं मुंबईत आगामन झाल्यानंतर विमानतळावरुन ते थेट शिवाजी पार्कात जाणार आहे. तिथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ते वंदन करतील. तिथेच शेजारी असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी राणे जाणार का?, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

Narayan Rane Live : केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन
नारायण राणेंकडून बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन
| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 1:18 PM
Share

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवाजी पार्कवर जाऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केलेलं आहे. मुंबईतल्या जन आशीर्वाद यात्रेत (Jan Ashirvad Yatra) राणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार की नाही, अशी चर्चा उभ्या महाराष्ट्रात रंगली होती. मात्र मुंबईतलं पहिलं भाषण आवरुन राणे थेट शिवाजी पार्कवर गेले आणि बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं.

यावेळी राणेंंसोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार नितेश राणे, आमदार अतुल भातखळकर, निलेश राणे, तृप्ती सावंत उपस्थित होत्या.

जन आशीर्वाद यात्रेतल्या पहिल्या सभेत राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला उध्वस्त करायला निघालेत. आपल्याला आपलं राज्य वाचवाचयं, पुन्हा भाजपचं सरकार आणायचंय, राज्य उद्धवस्त करणाऱ्यांना सत्तेतून खाली खेचायचंय”, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. आजपासून नारायण राणेंची मुंबईत जनआशीर्वाद यात्रा सुरु झाली. मुंबईतल्या पहिल्या भाषणात त्यांनी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढविला.

मोदी सरकारमधील मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirvad Yatra) सुरु आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आज मुंबईमध्ये जनतेचा आशीर्वाद मागत आहेत. सकाळी 11 वाजता त्यांचं मुंबई विमानताळवर आगमन झालं. त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. ढोल ताशांच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं.

आता उद्धव सरकारचा काळ संपला, राज्यात भाजपची सत्ता येणार

“महाराष्ठ्र उद्वस्त करायला निघालेल्या सांगू इच्छितो, तुमचा काळ संपला आहे. राज्यात पुन्हा भाजपाचे सरकार येणार आहे:, असा दावा करत यावेळी राणेंनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये बळ आणलं. आपल्याला महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी जोमाने काम करावं लागेल, कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

“महाराष्ट्रातील सरकाराने गेल्या अडीज वर्षात कोणताही विकास केलेला नाही.  उद्धव ठाकरे हे राज्याला उद्वस्त करत आहेत. आता हे सरकार हटविण्याची वेळ आली आहे. या सरकारचा काळ आता संपला आहे, महाराष्ट्रात पुन्हा भाजपचं सरकार येणार”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मला मिळालेलं पद जनतेचं पद

“मी काम करु शकतो हा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला. मला मिळालेलं पद हे जनतेचं पद आहे. केंद्रात मंत्री झाल्यानंतर वेगळा अनुभव घेता आला. महाराष्ट्राचं नाव देशात केल्याशिवाय राहणार नाही”, असंही राणे म्हणाले.

जन आशीर्वाद यात्रेला मुंबई पोलिसांची नोटीस

भाजपच्या मुंबईमधल्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी जमाव बंदीचे आदेश काढलेले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रा पार पडते आहे. मुंबईतल्या विविध भागांत जाऊन ते लोकांशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी मुंबई पोलिसांनी यात्रेला नोटीस पाठवली आहे.

(Union Minister Narayan Rane jan Aashirvad yatra in mumbai live update)

हे ही वाचा :

BJP Jan Ashirwad Yatra | भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला मुंबई पोलिसांची नोटीस

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.