नारायण राणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार की नाही?, शिवसेनेच्या 2 नेत्यांच्या 2 भूमिका!

राणेंना आम्ही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊ देणार नाही, अशी भूमिका कालपर्यंत सेना नेत्यांनी घेतली होती. मात्र आज सेना आमदार सदा सरवणकर यांनी यांनी राणेंना स्मृतीस्थळावर जाण्यापासून आम्ही रोखणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

नारायण राणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार की नाही?, शिवसेनेच्या 2 नेत्यांच्या 2 भूमिका!
नारायण राणे

मुंबई :  केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची मुंबईत आजपासून जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirvad yatra) सुरु होत आहे. आज नारायण राणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाणार असल्याची माहिती आहे. राणेंना आम्ही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊ देणार नाही, अशी भूमिका कालपर्यंत सेना नेत्यांनी घेतली होती. मात्र आज सेना आमदार सदा सरवणकर (sada sarvankar) यांनी यांनी राणेंना स्मृतीस्थळावर जाण्यापासून आम्ही रोखणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यावरुन राणेंना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊ देण्यासंबंधी शिवसेनेत दोन मतप्रवाह असल्याचं दिसून येत आहे.

शिवसेनेचे दोन नेते, दोन भूमिका

बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा राणेंना नैतिक अधिकार नाही. शिवसैनिक त्यांना स्मृती स्थळावर येऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला होता. मात्र आज शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी मात्र आम्हाला पक्षाचे कोणतेही तसे आदेश नाहीयत. बाळासाहेबांपुढे नतमस्तक व्हायला कुणी येत असेल तर त्याला विरोध का करायचा?, असा सवाल विचारुन शिवसेनेमधले मतप्रवाह स्वत:च अधोरेकित केले आहेत.

सदा सरवणकर काय म्हणाले?

नारायण राणे यांना विरोध करायचा की त्यांना स्मृती स्थळावर दर्शन येऊ द्यायचं याबाबतीत पक्षाकडून अद्याप कुठलेही आदेश आलेले नाहीत, असं स्पष्ट करत बाळासाहेबांपुढे नतमस्तक व्हायला कुणी येत असेल तर त्याला विरोध का करायचा, असा सवालच त्यांनी उपस्थित केला आहे.

विनायक राऊत काय म्हणाले होते?

नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. राणेंसारखा बाटगा आणि बाळासाहेबांशी बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा या घरफोड्याला शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देऊ देणार नाहीत, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला होता.

राणेंची जन आशीर्वाद यात्रा

मोदी सरकारमधील मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirvad Yatra) सुरु आहे. देशासह महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री तथा नवनिर्वाचित मंत्री जात आहेत. नव्याने मंत्री झालेले भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) आज मुंबईमध्ये जनतेचा आशीर्वाद मागत आहे. केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंनी आजपासून मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात केलीय.

जन आशीर्वाद यात्रेला मुंबई पोलिसांची नोटीस

भाजपच्या मुंबईमधल्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी जमाव बंदीचे आदेश काढलेले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रा पार पडते आहे. मुंबईतल्या विविध भागांत जाऊन ते लोकांशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी मुंबई पोलिसांनी यात्रेला नोटीस पाठवली आहे.

(Will Minister Narayan Rane go to Balasaheb’s memorial or not ?, 2 Stand of 2 leaders of Shiv Sena)

हे ही वाचा :

बाळासाहेबाच्या स्मृती स्थळावर जाण्यापासून शिवसैनिक राणेंना रोखणार?; विनायक राऊतांनी दिला ‘हा’ इशारा

नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाचं दर्शन घेणार

Published On - 11:41 am, Thu, 19 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI