AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुमच्या दिल्लीच्या बंगल्यावर कोण अभिनेत्री येते याची…’, संजय राऊतांवर भाजपा आमदाराचा गंभीर आरोप

"उडता मातोश्री बाबत चिंता करा. तुझ्या मालकाचा मुलगा ड्रग्सवाल्या लोकांसोबत का असतो? रिझवी कॉलेजच्या मागे कोण भेटायचं? अमली पदार्थाचे धागेदोरे मातोश्री वरून मिळतील. कुंपण शेत खात आहे" असा आरोप भाजपा आमदाराने केला.

'तुमच्या दिल्लीच्या बंगल्यावर कोण अभिनेत्री येते याची...', संजय राऊतांवर भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
sanjay raut
| Updated on: Jun 25, 2024 | 1:00 PM
Share

(महेश सावंत)  “काल कंगना रनौत यांनी महाराष्ट्र सदनमध्ये जाऊन राहण्यासाठी विचारपूस केली. त्यांना प्रशासनाने नाही म्हटलं. त्या निघून गेल्या. यावर संजय राऊतला मिरच्या झोंबल्या. त्या निवडून गेलेल्या खासदार आहेत. तुमच्या सारख्या बँकडोअरने आलेल्या नाहीत” अशी टीका नितेश राणे संजय राऊत यांच्यावर केली. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सचिन वाझे वर्षा बंगल्यावर तिकडे किती दिवस राहायचा? त्याच उत्तर कधी देणार” असा सवाल नितेश राणे यांनी विचारला. “संजय राऊत हे महाशय ज्या निवासस्थानी राहतात, तिथे बॉलीवूडची कलाकार किती दिवस राहिली याची माहिती द्यायची का?. हमाम मे सब नंगे है, उगाच बडबड करू नका” असं नितेश राणे म्हणाले.

“ड्रग्ज प्रकरणावरुन नितेश राणे यांनी संजय राऊतवर जोरदार हल्लाबोल केला. “गजनी झालेल्या राऊतला माहित नाही, अडीच वर्ष मविआची सत्ता होती. तुमचे मालक मुख्यमंत्री होते, तेव्हा ड्रग्स का थांबले नाहीत?. तुम्ही काय प्रयत्न केले? तुमचे गृहमंत्री जेलमध्ये होते” असं नितेश राणे म्हणाले. “उडता मातोश्री बाबत चिंता करा. तुझ्या मालकाचा मुलगा ड्रग्सवाल्या लोकांसोबत का असतो? रिझवी कॉलेजच्या मागे कोण भेटायचं? अमली पदार्थाचे धागेदोरे मातोश्री वरून मिळतील. कुंपण शेत खात आहे” असा आरोप नितेश राणे यांनी केला.

‘उडता पंजाब नंतर उडता मातोश्री चित्रपट काढायचा का?’

“तुमच्या सारखी सवय दुसऱ्यांना नाही. तुमच्या दिल्लीच्या बंगल्यावर कोण अभिनेत्री येते याची माहिती जनतेला मिळावी” असा आरोप नितेश राणे यांनी केला. “उज्वल निकम यांनी कसाबला फाशी देण्यास मदत केली. मात्र असंख्य गुन्हेगारांची बाजू घेणारे मेंनन वकील तुमच्या शरद पवारांच्या बाजूला बसतात. गुजरात मोठं केंद्र आहे की, मातोश्री तिसरा मजला केंद्र आहे, याची चौकशी केली पाहिजे. उडता पंजाब नंतर उडता मातोश्री चित्रपट काढायचा का?” अशा शब्दात नितेश राणे यांनी हल्लाबोल केला. “संजय राऊतने ड्रग्स या विषयावर बोलून, मालकाच्या मुलाला अडचणीत आणू नये मैत्रीचा सल्ला” असं नितेश राणे म्हणाले.

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....